Google | गुगलच्या ग्राहकांनो, ‘हे’ काम कराच; नाही तर मेल, फोटो, व्हिडिओ होणार डिलीट

Nupur Chilkulwar

|

Updated on: Nov 12, 2020 | 4:14 PM

येत्या 1 जूनपासून ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन वर्षांपासून इनअॅक्टिव्ह असलेली अकाउंट डिलिट करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.

Google | गुगलच्या ग्राहकांनो, 'हे' काम कराच; नाही तर मेल, फोटो, व्हिडिओ होणार डिलीट

नवी दिल्ली : सतत अपडेट असलेल्या गुगलने आता आपल्या ग्राहकांसाठी नवीन पॉलिसी (Google Might Delete Your All Content ) आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जूनपासून ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन वर्षांपासून इनअॅक्टिव्ह असलेली अकाउंट डिलिट करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. ज्या ग्राहकांचे अकाउंट गेल्या दोन वर्षांपासून वापरात नाहीत. त्यांचे जीमेल आणि ड्राइव्ह डिलीट होणार असल्याने ग्राहकांचे फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाचे मेसेजही डिलीट होणार आहेत (Google Might Delete Your All Content ).

जे सक्रिय गुगलवर सक्रिय नाहीत, त्यांच्यासाठी हे नवे धोरण आहे. तसेच जे जी-मेल, ड्राईव्हवर (गूगल डॉक्स, शीट्स, स्लाईड, ड्रॉईंग, फॉर्म आणि जॅमबोर्ड फाईल्स) स्टोरेज कपॅसिटीची लिमीट क्रॉस करत आहेत, त्यांच्यासाठीही हे नवे धोरण लागू होणार असल्याचं कंपनीने बुधवारी ही माहिती दिली.

गूगलने काय म्हटलं?

“जर तुमच्या अकाऊंटमध्ये 2 वर्षांपासून स्टोरेज लिमीट जास्त असेल, तर गूगल तुमचा कंटेंट जो जी-मेल, ड्राईव्ह, व्हिडीओ आणि फोटोवर असेल तो काढू शकतो”, असं गूगलने सांगितलं. मात्र, कंटेट हटवण्यापूर्वी गूगल युझर्सला अनेकदा याची सूचना देईल. त्यामुळे गुगलवर तुमचं अकाऊंट सक्रिय ठेवण्याचा सर्वात सोपा पर्याय म्हणजे ऑफिसचं काम करताना, इंटरनेट वापरताना अधेमधे आपल्या जी-मेल, ड्राईव्ह आणि फोटो उघडून बघा. “जर तुम्हाला तुमच्या निशुल्क 15 जीबी स्टोरेजपेक्षा जास्त स्टोरेजची गरज आहे तर तुम्ही गूगलच्या जास्त स्टोरेज प्लॅनमध्ये अपग्रेड करु शकता”, असंही गुगलने स्पष्ट केलं आहे.

गूगल वन सर्व्हिस

Google One कंपनीचा पेड मेंबरशीप प्लॅन आहे. याचा वापर तुम्ही स्टोरेज वाढवण्यासाठी तसेच, फोन बॅकअपसाठी करु शकता. त्याशिवाय, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गूगल एक्सपर्ट्स आणि फॅमिली शेअरिंगचा एक्सेस देखील मिळतो. नुकतीच गूगलने VPN सुविधा सुरु केली आहे. त्याशिवाय, कंपनीने प्रो सेशनची सुरुवातही केली आहे. या माध्यमातून मेंबर्स गूगल एक्सपर्टसोबत वन-टू-वन संपर्क साधू शकतात, असंही कंपनीने स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

तुमच्या फोनमधून ‘हे’ अॅप्स तात्काळ डिलीट करा, अन्यथा फोनमधून पैसे उडतील

आता Amazon Prime वरही Live cricket streaming पाहायला मिळणार, भारतासह या देशांच्या सामन्यांचे प्रक्षेपण

WhatsApp द्वारे शॉपिंग करा! नवं फिचर येतंय

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI