Redmi Note 13 Pro Plus मोबाईल स्वस्तात घेण्याची संधी, कसं काय ते जाणून घ्या

रेडमी नोट 13 प्रो प्लस मोबाईल तुम्हाला घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण या फोन डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हा स्वस्तात घेण्याची संधी चालून आली आहे. चला जाणून घेऊयात या फोनची खासियत आणि इतर गोष्टी

Redmi Note 13 Pro Plus मोबाईल स्वस्तात घेण्याची संधी, कसं काय ते जाणून घ्या
Redmi Note 13 Pro Plus मोबाईल स्वस्तात घेण्याची संधी, कसं काय ते जाणून घ्या
Image Credit source: Xiaomi
| Updated on: Sep 03, 2025 | 10:31 PM

गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही 25 ते 30 हजार रुपयांच्या रेंजमध्ये एखादा फोन शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण रेडमी नोट 13 प्रो प्लस हा फोन तुम्हाला स्वस्तात घेण्याची संधी आहे. या फोनवर तुम्हाला 8 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. कारण या फोनमध्ये चांगले फीचर्स आहेत. रेडमी स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा वक्र AMOLED पॅनेल आहे आणि हा फोन 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 1800 निट्स पीक ब्राइटनेस आणि HDR10 प्लस सपोर्टसह येतो. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन वापरले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसह मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 अल्ट्रा प्रोसेसर आहे. 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली असून 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे हा फोन सध्याच्या सर्व तांत्रिक गरजा भागवू शकतो. 200 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर असलेल्या फोनमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे या फोनची भूरळ पडल्याशिवाय राहणार नाही. त्यात स्वस्तात मिळणार असेल तर सांगायलाच नको…

रेडमी स्मार्टफोनचा 12 जीबी /256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 34999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना हा फोन महाग वाटत होता. पण आता हा व्हेरिएंट फ्लिपकार्टवर सवलतीच्या दरात मिळत आहे. त्याची किंमत 26999 रुपये इतकी आहे. म्हणजेच हा फोन 8000 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. या सवलतीमुळे रेडमी फोन नथिंग फोन 3ए, रियलमी 15 5जी, व्हिवो टी4 5जी, वनप्लस नॉर्ड सीई 5जी सारख्या स्मार्टफोन्सशी थेट स्पर्धा करेल.

या फोनवर तुम्हाला आणखी सवलत मिळू शकते. जर तुमच्याकडे एक्सिस बँक क्रेडिट कार्ड किंवा फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे घेतल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. म्हणजेच आणखी 4 हजारांची आणखी सवलत मिळेल. तसेच एक्सिस बँक फ्लिपकार्ट डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5 टक्के कॅशबॅक फायदा देखील मिळत आहे. तुमच्या यापैकी कोणतंही कार्ड असेल तर तुम्ही त्या संधीचा फायदा घेऊ शकता. इतकंच काय तर हा फोन ईएमआयवर देखील मिळत आहे. दरमहा 950 रुपयांपासून ईएमआय सुरु करण्याची सुविधा उपलब्ध आहे.