…तर तुमचेही WhatsApp चॅट लिक होऊ शकते; त्यापासून बचावासाठी ‘हे’ करा!

...तर तुमचेही WhatsApp चॅट लिक होऊ शकते; त्यापासून बचावासाठी 'हे' करा!
आता व्हॉट्सअॅप अकाउंट मल्टी-डिव्हाईसशी लिंक करता येणार

बॉलिवूड सेलिब्रिटींचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट लिक झाल्यानंतर लोकांच्या मनात असे प्रश्न येतोय की, व्हॉट्सअ‍ॅप खरोखर सुरक्षित आहे का?

अक्षय चोरगे

|

Oct 20, 2020 | 9:00 PM

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट लिक झाल्यानंतर लोकांच्या मनात असे प्रश्न येऊ लागले आहेत की व्हॉट्सअ‍ॅप खरोखर सुरक्षित आहे का? व्हॉट्सअ‍ॅपच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमुळे लोकांना वाटत होतं की, त्यांचे व्हॉट्सअॅप चॅट कोणीही वाचू शकत नाही किंवा चॅट डिलीट झाल्यानंतर पुन्हा मिळवता येणार नाही. पण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या चॅट लिकच्या घटनांनी लोकांना संभ्रमात टाकले आहे. लोक व्हॉट्सअ‍ॅपच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करीत आहेत. (here is how you can make secure your whatsapp chat; know what you have to do)

व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी कसं काम करते

एबीपीच्या वृत्तानुसार, सायबर तज्ज्ञ पवन दुग्गल म्हणाले की, “व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये असे लिहिले आहे की, व्हॉट्सअ‍ॅपवर युजरने शेअर केलेली माहिती ही सार्वजनिक माहिती आहे आणि त्यास गोपनियतेचे धोरण लागू होत नाही. हेदेखील खरे आहे की, व्हॉट्सअॅप चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत. म्हणजे तुम्ही मोबाईल, कंप्युटरवरुन मेसेज पाठवता, तो मेसेज पाठवल्यानंतर कोणतीही तिसरी व्यक्ती तुमचा मेसेज वाचू शकत नाही. परंतु मेसेज पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला की कोणीही तुमचं चॅट अगदी सहजरित्या हॅक करु शकतं”.

त्यांनी सांगितले की, “तुम्ही कोणाला आणि काय पाठवत आहात, तुम्ही कोणत्या ग्रुपचे सदस्य आहात याबाबतची माहिती कंपनी साठवून ठेवते. व्हॉट्सअॅप 2016 पासून त्यांच्या युजर्सची माहिती फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर करत आहे. याचाच अर्थ ते सर्व युजर्सचं प्रोफायलिंग करतात. त्यामुळेच जर तुम्ही कोणताही विचार न करता तुमची कोणतीही माहिती शेअर करत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता”.

तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅट हॅक होऊ द्यायचं नसेल तर ‘हे’ फंडे वाचा

WhatsApp त्यांच्या युजर्सना टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनची सुविधा देतं. या फिचरचा वापर करताना व्हॉट्सअॅप तुम्हाला सहा अंकी कोड विचारतं. ज्याद्वारे कोणताही हॅकर तुमचं व्हॉट्सअॅप हॅक करु शकत नाही. जर कोणत्याही हॅकरने तसा प्रयत्न केला तर व्हॉट्सअॅप त्यला सहा अंकी कोड मागेल. जो कोड त्या हॅकरकडे नसल्यामुळे तो तुमचं अकाऊंट हॅक करु शकत नाही.

जर तुम्ही व्हॉट्सअॅप चॅट्सचा बॅकअप गुगल ड्राईव्ह, आय क्लाऊड किंवा इमेलवर ठेवत असाल तर तुम्ही जास्त सावध असणं आवश्यक आहे. WhatsApp चॅटचा बॅकअप घेत असताना एंड टू एंड एन्क्रिप्शन बंद होतं. याचाच अर्थ जे चॅट केवळ दोन युजर्समध्ये मर्यादित होतं ते चॅट आता दुसऱ्या सिस्टिमवरदेखील आहे. त्यामुळेच ते चॅट सुरक्षित राहात नाही. विशेष म्हणजे तुम्ही जर ते चॅट डिलीट करत असाल तर एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवायला हवी की, ते चॅट तुम्ही गुगल ड्राईव्ह आणि आयक्लाऊडवरुनही डिलीट करायला हवं.

संबंधित बातम्या

वेब व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर, लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार

सावधान! तुमचा डेटा चोरी होतोय, Google play store वरुन 34 अॅप्स हटवले

आता प्रत्येक ट्रांजॅक्शनवर कॅशबॅक, Paytm चं क्रेडिट कार्ड लाँच

Flipkart Big Billion Days Sale: ‘या’ पाच टीव्हींवर जबरदस्त डिस्काऊंट

(here is how you can make secure your whatsapp chat; know what you have to do)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें