कसा काम करतो सॅटेलाईट फोन? एक तास बोलण्यासाठी येतो इतका खर्च

जर आपण किंमतीबद्दल बोललो, तर सॅटेलाइट फोन वापरण्याची किंमत इतकी जास्त आहे की आपण त्याचा अंदाज देखील लावू शकत नाही. सॅटेलाइट फोनवर काही तास बोलले तर त्याची किंमत लाखांत येते.

कसा काम करतो सॅटेलाईट फोन? एक तास बोलण्यासाठी येतो इतका खर्च
सॅटेलाईट फोन
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 01, 2023 | 10:25 PM

मुंबई : आज जगभरात मोबाईल फोन वापरले जात आहेत, त्यांच्यामुळे तुम्ही कोणाशीही संपर्क साधू शकतो.  स्मार्टफोनच्या सिग्नलसाठी मोठ मोठे मोबाईल टॉवर लावले आहेत. ज्यामुळे नेटवर्कचे जाळे खूप चांगले आहे आणि फोन करण्यात कोणतीही अडचण येत नाही. मात्र, तुम्ही दुर्गम भागात गेल्यावर एखाद्याला कॉल करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तसे करणे खूप अवघड असते, खरे तर अशा भागात नेटवर्कची समस्या असते कारण येथे जास्त टॉवर बसवता येत नाहीत. अशा स्थितीत स्मार्टफोनचा सिग्नल वीक पडतो. तुम्हाला माहित आहे का की असा एक फोन अस्तितत्वात आहे ज्यामध्ये सिग्नलची अजिबात गरज नाही. ज्याला सॅटेलाइट फोन (Satellite Phone) म्हणतात.

सॅटेलाइट फोन कसा काम करतो

भारतासह जगभरात अनेक दशकांपासून सॅटेलाइट फोनचा वापर केला जात आहे. सिग्नलची ताकद कमी असेल किंवा सिग्नल अजिबात येत नाही अशा ठिकाणी ते काम करू शकतात. हे त्याच्या नावाप्रमाणे उपग्रहाच्या मदतीने काम करते. त्याची ऑडिओ गुणवत्ता इतकी चांगली आहे की ती सामान्य स्मार्टफोनमधूनही उपलब्ध होत नाही. तथापि, प्रत्येकाला ते वापरण्याची परवानगी नाही. जर आपण त्याच्या वैशिष्ट्याबद्दल बोललो तर ते देशाच्या कोणत्याही भागात वापरले जाऊ शकते आणि आपण ते विमान प्रवास किंवा जहाजात देखील वापरू शकता. भारतात फक्त निवडक लोकांनाच सॅटेलाइट फोन वापरण्याची परवानगी आहे. ते वापरण्याची परवानगी केवळ संरक्षण, लष्कर, बीएसएफसह आपत्ती व्यवस्थापनासाठी आहे. यासह इतर काही निवडक लोकं देखील हे वापरू शकतात.

वापरण्यासाठी किती खर्च येतो

जर आपण किंमतीबद्दल बोललो, तर सॅटेलाइट फोन वापरण्याची किंमत इतकी जास्त आहे की आपण त्याचा अंदाज देखील लावू शकत नाही. सॅटेलाइट फोनवर काही तास बोलले तर त्याची किंमत लाखांत येते. अशा स्थितीत तुम्ही तो वापरण्याचा विचारही करू शकत नाही. सामान्य स्मार्टफोन वापरण्याची किंमत काहीच नाही. अशा परिस्थितीत सामान्य लोकांसाठी फक्त एक सामान्य स्मार्टफोन आहे, ज्याची किंमतही कमी आहे, तसेच त्याचा वापर करण्याचा खर्चही कमी आहे. जर तुम्हाला परवाणगी मिळाली तर 30,000 ते 50,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सॅटेलाइट फोन खरेदी करू शकता.