
तुम्हाला आता तंत्रज्ञानाच्या जगतात एआय शब्द आपसूक कानावर पडला आहे. एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंस… कृत्रिम मानव असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. कारण माणसाच्या बुद्धीमत्तेइतकी त्याची ताकद आहे. त्यापेक्षा जास्त आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण काही किचकट कामं एआयच्या माध्यमातून चुटकीसरशी पूर्ण होतात. त्यामुळे अनेक नोकऱ्या संकटात आल्या आहेत. अनेकांनी या एआयची धास्ती घेतली आहे. कारण ज्या कामासाठी महिन्यांचा अवधी लागत होता ती कामं अवघ्या काही मिनिटात पूर्ण होत आहेत. पण असं सर्व असताना त्याचे दुष्परिणामही दिसू लागले आहेत. नुकतंच एका व्यक्तीने एआयचा सल्ला ऐकला आणि त्याला रुग्णालयात भरती व्हावं लागलं होतं. त्यामुळे खरंच एआयवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न समोर आला आहे. नुकत्याच एमआयटीच्या रिपोर्टमध्ये एआयच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. जगातील टॉप इंस्टीट्यूटच्या रिपोर्टनुसार, एआयवर विश्वास टाकणं मोठ्या टेक कंपन्यांना महागात पडू शकतं. इतकंच काय तर...