आता इंटरनेटशिवाय पैसे पाठवता येणार, वापरा ‘ही’ सोपी पद्धत

अनेकदा इंटरनेट नसल्यामुळे आपल्याला पैसे पाठवण्यात अडचण येते. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. भारत सरकार आणि NPCI ने एक खास सेवा प्रदान केली आहे, ज्याद्वारे इंटरनेटशिवाय पैसे पाठवता येतात.

आता इंटरनेटशिवाय पैसे पाठवता येणार, वापरा ही सोपी पद्धत
UPI व्यवहारांवर जीएसटी लागणार?
| Updated on: Jun 29, 2025 | 3:08 PM

सध्याच्या आधुनिक युगात आपण सर्वजण पैसे पाठवण्यासाठी UPI चा वापर करतो. मात्र अनेकदा इंटरनेट नसल्यामुळे आपल्याला पैसे पाठवण्यात अडचण येते. त्यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागतो. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. भारत सरकार आणि NPCI ने एक खास सेवा प्रदान केली आहे जी USSD आधारित UPI सेवा आहे.

USSD आधारित UPI सेवा वापरण्यासाठी तु्म्हाला इंटनेटची गरज भासत नाही. ही सेवा *99# क्रमांकाद्वारे काम करते. याद्वारे तुम्ही इंटरनेटशिवाय सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकता. ही सेवा कशी काम करते? एकावेळी किती पैसे पाठवता येतात याबाबत माहिती जाणून घेऊयात.

*99# UPI सेवा काय आहे?

*99# ही USSD आधारित मोबाइल बँकिंग सेवा आहे. या सेवेद्वारे इंटरनेटशिवाय आणि स्मार्टफोनशिवाय पैसे पाठवता येतात. तसेच बँक बॅलन्स तपासता येतो, तसेच तुमचा UPI पिन देखील बदलता येतो. महत्वाची बाब म्हणजे ही सेवा 24×7 काम करते आणि देशातील Airtel, Jio, Vi, BSNL या सर्व मोबाइल नेटवर्कवर उपलब्ध आहे.

इंटरनेटशिवाय पैसे कसे पाठवायचे?

इंटरनेट नसताना पैसे पाठवायचे असतील तर सर्वप्रथम *99# टाइप करा आणि कॉल करा. यानंतर तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय मिळेल. भाषा निवडल्यानंतर 1 डायल करा. यानंतर, ज्या UPI आयडीवर तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत ती माहिती प्रदान करा. यानंतर UPI पिन टाकण्यास सांगितले जाईल. पिन व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवू शकाल. या सेवेद्वारे तुम्ही फक्त 5000 रुपये ट्रान्सफर करू शकता. *99# ला कॉल करुन तुम्ही तुमचा UPI पिन देखील बदलू शकता.

UPI पिन कसा सेट करायचा?

तुमच्या मोबाईलच्या डायलरमध्ये *99# कोड टाका आणि कॉल करा, यानंतर भाषा निवडा. यानंतर Set UPI PIN चा पर्याय निवडा. हा पर्याय 5 व्या क्रमांकावर मिळू शकेल. यानंतर अकाउंट नंबरचे शेवटचे 6 अंक आणि डेबिट कार्डची एक्सपायरी डेट टाका. यानंतर मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP टाका. यानंतर तुम्हाला UPI ​​पिन सेट करण्यास सांगितले जाईल.