HP कंपनीचे ‘हे’ 3 नवीन एआय लॅपटॉप भारतात लाँच, जाणून घ्या त्यांची किंमत आणि आश्चर्यकार फिचर्स
एचपी कंपनीने भारतात त्यांची नवीन ओम्निबुक 2026 सिरीज लाँच केली आहे. या नवीन लॅपटॉप्समध्ये एआय फीचर्स, ओएलईडी डिस्प्ले, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि इंटेल अल्ट्रा प्रोसेसर्स आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या लॅपटॉपची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

एचपी कंपनीने सोमवारी भारतात त्यांचा नवीन ओम्निबुक 2026 लॅपटॉप सिरीज लाँच केले, ज्यामध्ये एचपी ओम्निबुक अल्ट्रा 14, ओम्निबुक एक्स आणि ओम्निबुक 5 यांचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की, हे नवीन लॅपटॉप विशेषतः एआय-आधारित कामांसाठी डिझाइन केलेले आहेत आणि 80 टॉप्स पर्यंत एआय परफॉर्मन्स देतात. तर लाँच करण्यात आलेल्या नवीन ओम्निबुक सिरीजमध्ये इंटेल कोअर अल्ट्रा आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एक्स प्रोसेसरचा वापर केला आहे.
कंपनीने हे लॅपटॉप प्रीमियम डिझाइन, दीर्घ बॅटरी लाईफ आणि उच्च-गुणवत्तेच्या ओएलईडी डिस्प्लेसह सादर केले आहेत. भारतात त्यांची सुरुवातीची किंमत 1 लाख 24 हजार 999 रूपयांपासून सुरू होते.
भारतातील किंमत
भारतात HP OmniBook Ultra 14 (2026) च्या स्नॅपड्रॅगन व्हेरिएंटची किंमत 1 लाख 89 हजार 999 रूपयांपासून सुरू होते, तर इंटेल अल्ट्रा व्हेरिएंटची किंमत 2 लाख 14 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. HP OmniBook X (2026) ची किंमत 1 लाख 69 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. HP OmniBook 5 (2026) ची किंमत 1 लाख 24 हजार 999 रूपयांपासून सुरू होते.
HP OmniBook Ultra 14 मध्ये मिळणार हे धमाकेदार फिचर्स
HP OmniBook Ultra 14 (2026) हे कंपनीचे सर्वात प्रीमियम मॉडेल आहे, जे इंटेल कोर अल्ट्रा 7 356H आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एक्स प्रोसेसर पर्यायांसह लाँच करण्यात आले आहे.
या लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा 3K OLED टचस्क्रीन डिस्प्ले असून तो 120Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि 500 nits ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
कंपनीच्या मते हा लॅपटॉप 50 TOPS पर्यंत AI परफॉर्मन्स देऊ शकतो. यात 16GB LPDDR5x रॅम आणि 1TB SSD स्टोरेज आहे.
या लॅपटॉपमध्ये व्हेपर चेंबर कूलिंग, 5MP IR कॅमेरा, Wi-Fi 7 आणि ब्लूटूथ 6 ही फिचर्स देखील आहेत. याची बॅटरी अंदाजे 22.75 तास टिकते असा दावा केला जातो.
OmniBook X आणि OmniBook 5 देखील लाँच
कंपनीने OmniBook X आणि OmniBook 5 देखील लाँच केले आहेत. OmniBook 5 मध्ये Intel Core Ultra 7 355 प्रोसेसर आहे, जो एआय कार्यांसाठी 49 टॉप्स पर्यंत एनपीयू परफॉर्मन्स देण्याचा दावा करतो.
यात 91 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ असलेला 14-इंचाचा 2के ओएलईडी डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप 16 जीबी रॅम आणि 1 टीबी एसएसडी स्टोरेजला देखील सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे की याची बॅटरी अंदाजे 21.5 तास टिकू शकते आणि 65 वॅट फास्ट चार्जिंगने 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते.
डिझाइन, बॅटरी आणि एआय वैशिष्ट्यांवर विशेष लक्ष
नवीन HP OmniBook सिरीजमध्ये स्लिम आणि प्रीमियम डिझाइन आहे. OmniBook 5 फक्त 13.6 मिमी पातळ असून त्याचे वजन अंदाजे 1.33 किलो आहे.
या लॅपटॉप्समध्ये बॅकलिट कीबोर्ड, कोपायलट बटन्स आणि स्मार्ट जेश्चर सपोर्ट असलेले टचपॅड आहेत. कंपनीने वापरकर्त्यांना उत्तम मल्टीटास्किंग आणि स्मार्ट वर्कचा अनुभव देण्यासाठी एआय-आधारित वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
शिवाय, सर्व मॉडेल्स विंडोज 11 वर चालतात आणि ऑनलाइन मीटिंग्ज व कंटेंट क्रिएशनसारख्या कामांसाठी डिझाइन केलेले आहेत. एचपी कंपनीच्या मते नवीन ओम्निबुक सिरीज व्यावसायिक आणि क्रिएटर्स या दोघांसाठीही एक उत्तम पर्याय ठरू शकते.