iPhone : तुमच्या ‘आयफोनचा’ स्पीड वाढवायचा आहे का… तर, या सोप्या ‘टिप्स’ फॉलो करा !

| Updated on: May 01, 2022 | 9:19 PM

या काही टॉप टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या वापरून तुम्ही आयफोनचा वेग वाढवू शकता.

iPhone : तुमच्या ‘आयफोनचा’ स्पीड वाढवायचा आहे का...  तर, या सोप्या ‘टिप्स’ फॉलो करा !
iPhone
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : तुमचा आयफोन कालांतराने मंदावतो (It slows down over time) असे का होत असेल, तर याची अनेक कारणे आहेत. जुनी iOS व्हर्जन वापरण्यापासून ते तुमच्या स्मार्टफोनची गती कमी करणाऱ्या अ‍ॅनिमेशन इफेक्टपर्यंत पार्श्वभूमीत अनेक अ‍ॅप्स आपल्या फोनमध्ये असल्याने, फोनचा स्पीड मंदावत असतो. तुम्‍ही स्‍लो आयफोन वापरत असल्‍यास, तुम्‍ही त्याचा वेग वाढवण्‍यासाठी (To speed up) काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. तुमच्या आयफोनचा वेग वाढवण्यासाठी तुम्ही वापरू शकता अशा सर्वात उपयुक्त तंत्रांपैकी एक म्हणजे ते पुन्हा सुरू करणे. हे करण्यासाठी, तुम्हाला फक्त व्हॉल्यूम बटण आणि साइड बटण 30 सेकंद दाबून धरून ठेवावे लागेल आणि डिव्हाइस बंद करण्यासाठी पॉवर ऑफ-स्लायडर ड्रॅग करावे लागेल. याशिवाय तुमच्या iPhone वर सॉफ्टवेअर अपडेट करणेही महत्वाचे असते. आपण अपडेशनच्या मॅसेजकडे (To the update message) सतत दुर्लक्ष करतो. परंतु, तसे न करता नेहमी सॉफ्टवेअर अपडेट करणे योग्य असते.

जुन्या व्हर्जनची समस्या

तुमचा iPhone मंद होण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या जुन्या iOS व्हर्जनमध्ये समस्या आहेत. हे सहजपणे निश्चित केले जाऊ शकते, फक्त तुमच्या iPhone वर iOS चे व्हर्जन डाउनलोड करून. तुम्हाला सेटिंग्ज ॲप, सींपल सॉफ्टवेअर अपडेट क्लीक करा आणि अपडेट करा.

भरपूर स्पेस हवा

तुमच्या iPhone वर स्पेस भरपूर प्रमाणात हवा. एका आयफोनमध्ये खुप डाटा संग्रहीत केल्यास, त्याची स्पेस कमी होत जाते आणि तो मंद गतीने चालायला लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या iPhone वर न वापरलेले अ‍ॅप्स आणि फाइल्स काढून टाकणे. तुम्ही तुमच्या iPhone वरून मोठे व्हिडिओ (जर तुमच्याकडे असल्यास) काढून टाकू शकता, त्यामुळे तुम्ही तुमच्या iPhone वर काही स्टोरेज मोकळे करू शकता.

हे सुद्धा वाचा

बॅकअप ॲप रिफ्रेश करा

बॅकअप ॲप रिफ्रेश करणेही महत्वाचे असते. काही काळाने, तुमचा iPhone हळू होऊ शकतो. हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे हे फीचर बंद करणे. तुम्हाला यासाठी, सेटिंग्ज ॲपमध्ये, बॅकअप ॲप रिफ्रेश वर टॅग करा.

लोकेशन बंद करा

लोकेशन सतत सुरू राहील्यास, ते तुमच्या आयफोनची गती कमी करते. लोकेशन ॲप बंद केल्यास, तुम्ही फोनचा वेग वाढवू शकता. त्यासाठी सेटिंग्ज ॲप मध्ये लोकेशन ला टॅग करा.

अनावश्यक अ‍ॅप्स बंद करा

तुमचा आयफोन फास्ट चालवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पार्श्वभूमीत चालणारे सर्व अनावश्यक अ‍ॅप्स बंद करणे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की व्हिडिओ एडीटींग किंवा बॅकअपवर चालणारे गेम सारखे ॲप तुमचा iPhone सर्वाधीक स्लो करू शकतो.