AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, DC vs LSG : लखनौकडून सातव्या विजयासह प्लेऑफसाठी दावा, दिल्लीचा सहा धावांनी पराभव, पाहा Highlights Video

लखनौचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल कारकिर्दीतील 29वे अर्धशतक झळकावले. तर हुड्डानेही अर्धशतक ठोकले.

IPL 2022, DC vs LSG : लखनौकडून सातव्या विजयासह प्लेऑफसाठी दावा, दिल्लीचा सहा धावांनी पराभव, पाहा Highlights Video
लखनौकडून सातव्या विजयासह प्लेऑफसाठी दावाImage Credit source: social
| Updated on: May 01, 2022 | 9:05 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील 45 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौने 20 षटकांत 3 गडी गमावून 195 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने 77 आणि दीपक हुडाने 52 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा (DC) संघ 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 189 धावा करू शकला. यामुळे आजचा सामना लखनौच्या पदरात पडला. या विजयासह लखनौचा संघ 10 सामन्यांपैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे 14 गुण आहेत. लखनौ संघाने प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत केला आहे. त्याचवेळी दिल्ली संघाचा नऊ सामन्यांतील हा पाचवा पराभव ठरला. आठ गुणांसह दिल्लीचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, लखनौचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल कारकिर्दीतील 29वे अर्धशतक झळकावले. तर हुड्डानेही अर्धशतक ठोकले.

दिल्ली आणि लखनौ सामन्याती सुपर षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दिल्ली संघ अपयशी

दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने संघाला पहिला धक्का दिला. त्याने पृथ्वी शॉला कृष्णप्पा गौतमकडून झेलबाद केले. शॉला सात चेंडूंत पाच धावा करता आल्या. पृथ्वी शॉनंतर डेव्हिड वॉर्नरही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. वॉर्नरला तीन धावा करता आल्या. शॉला दुष्मंथा चमीराने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी मोहसीन खानने वॉर्नरला आयुष बडोनीकडून झेलबाद केले. दिल्ली कॅपिटल्सला आठव्या षटकात तिसरा धक्का बसला. सामन्यात पहिल्याच चेंडूवर चांगली फलंदाजी करणाऱ्या मिचेल मार्शला कृष्णप्पा गौतमने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मार्श 20 चेंडूत 37 धावा काढून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकार मारले. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला क्लीन बोल्ड केले.

मोहसीन खान, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

लखनौनं काय केलं?

लखनौच्या संघाला पाचव्या षटकात 42 धावांवर पहिला धक्का बसला. शार्दुलने क्विंटन डी कॉकला ललित यादवकडून झेलबाद केलं. डी कॉकने 13 चेंडूत 23 धावा केल्या. त्यानंतर लखनौला दुसरा धक्का दीपक हुड्डाचा बसला. 15व्या षटकात लखनौला 137 धावांवर दुसरा धक्का बसला. शार्दुलने त्याच्याच चेंडूवर दीपक हुडाचा झेल घेतला. हुडाने 34 चेंडूत 52 धावांची खेळी खेळली. बाद होण्यापूर्वी हुडाने कर्णधार केएल राहुलसोबत 61 चेंडूत 95 धावांची भागीदारी केली होती.लखनौला 19व्या षटकात 176 धावांवर तिसरा धक्का बसला. शार्दुल ठाकूरने लखनऊचा कर्णधार केएल राहुलला बाऊंड्री लाइनवर ललित यादवकडून झेलबाद केलं. राहुलला 51 चेंडूत 77 धावा करता आल्या. तिन्ही विकेट शार्दुल ठाकूरने घेतल्या आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.