सेल्फी मिरर फीचर असलेला भारतातील पहिला फोन लाँच, किती आहे किंमत?

सेल्फी मिरर फीचर असलेला रियलमीच्या या फोनने भारतात दमदार प्रवेश केला आहे. यामध्ये मीडियाटेक प्रोसेसर आणि 4200 निट्स पीक ब्राइटनेस असलेला अमोलेड डिस्प्ले आहे. चला या फोनची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

सेल्फी मिरर फीचर असलेला भारतातील पहिला फोन लाँच, किती आहे किंमत?
Realme 16 5G Smartphone
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Apr 02, 2026 | 10:09 PM

Realme 16 5G भारतात लॉंच झाला आहे. याच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मीडियाटेक प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. त्यासोबतच या फोनमध्ये 4200 nits पीक ब्राइटनेस व मोठी 7000 mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सल कॅमेरा यांचा समावेश आहे. चला आजच्या लेखात जाणून घेऊयात की सेल्फी मिरर फीचर असलेल्या या फोनची किंमत किती आहे.

भारतात रियलमी 16 5G ची किंमत

8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31 हजार 999 रूपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 33 हजार 999 रूपये आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 36 हजार 999 रूपये आहे. हा हँडसेट एअर ब्लॅक आणि एअर व्हाईट रंगांमध्ये उपलब्ध आहे. उपलब्धतेचा तपशील 5 एप्रिलपासून फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाइटवर जाहीर केला जाईल.

रियलमीच्या या फोनवर लाँच ऑफरमध्ये 12 महिन्यांपर्यंतच्या नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांचा समावेश आहे. तुम्ही 2 हजार रूपयापर्यंतची बँक कार्ड सवलत आणि 6000 रूपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळवू शकता. रियलमी फोनच्या तुलनेत याची स्पर्धा नथिंग फोन 4a, मोटोरोला एज 70 फ्यूजन, पोको X8 प्रो आणि गूगल पिक्सल 9A सारख्या मॉडेल्सशी आहे.

रियलमी 16 5G फिचर्स

स्क्रीन: या हँडसेटमध्ये 6.57-इंचाचा फुल एचडी+ अमोलेड डिस्प्ले असून, त्यात 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 3000Hz इन्स्टंट टच सॅम्पलिंग रेट आणि 4200 nits ची कमाल ब्राइटनेस आहे.

चिपसेट: मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 टर्बो प्रोसेसरद्वारे समर्थित हा फोन वेग आणि मल्टीटास्किंग प्रदान करते.
6050mm sq हिट डिसिपेशन क्षेत्र असलेल्या व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टीम आहे. तसेच याद्वारे धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP69 रेटिंग देखील मिळाले आहे.

कॅमेरा: मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑटोफोकससह 50-मेगापिक्सलचा वाइड-अँगल सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे. मागील कॅमेऱ्याच्या बाजूला एक छोटा आरसा आहे, ज्याला रियलमी ‘सेल्फी मिरर’ म्हणटलेलं आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना मागील कॅमेऱ्याने काढलेले सेल्फी आधी पाहता येतात आणि काढता येतात. फोनच्या पुढील बाजूस 50-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

बॅटरी: यामध्ये पॉवरफूल 7000mAh बॅटरी दिली आहे, जी 60W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.

ओएस: हा ड्युअल-सिम फोन अँड्रॉइड 16 वर आधारित रियलमी यूआय 7.0 वर चालतो. कंपनी या फोनला चार वर्षांचे सुरक्षा अपडेट्स आणि तीन अँड्रॉइड ओएस अपग्रेड्स देईल.

Follow Us