AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur RSS: संघ मुख्यालयाची रेकी… थेट पाकिस्तानात शिजला कट… कुणी केलं टेरर फंडिंग? त्या दाव्यानं मोठी खळबळ

RSS Headquarters Terrorist reconnaissance: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरमध्ये मुख्यालय आहे. संघ कार्यालय उडून देण्याची अनेकदा धमकी देण्यात आली आहे. तर संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याप्रकरणी आता मोठा खुलासा समोर आला आहे.

Nagpur RSS: संघ मुख्यालयाची रेकी... थेट पाकिस्तानात शिजला कट... कुणी केलं टेरर फंडिंग? त्या दाव्यानं मोठी खळबळ
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मुख्यालय, जैश-ए- मोहम्मदImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 19, 2026 | 8:50 AM
Share

Nagpur RSS Headquarters Terrorist reconnaissance: नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उडवून देण्याची अनेकदा धमकी देण्यात आली आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी करण्यासाठी दहशतवादी रईस अहमद शेख अब्दुला शेख याला मोठी फंडिग करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्याला काश्मीर पोलिसांनी जानेवारी 2022 मध्ये अटक केली होती. त्याच्या कबुलीजबाबातून अनेक धक्कादायक खुलासे झाले. तर आता त्याला टेरर फंडिंग करण्यात आल्याचं समोर आले आहे. रेकीची कट हा पाकिस्तानात रचल्या गेला. तर या रेकीसाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये रईसला प्रशिक्षण देण्यात आले.

अमेरिकन डॉलरचा वापर

दहशतवादी रईस अहमद शेख अब्दुल्ला शेख याला मोठं टेरर फंडिंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचे नागपूर येण्यासाठी यूएस डॉलरमध्ये इंडिगो विमानाचे पेमेंट करण्यात आले. त्याच्या विमान प्रवासासाठी ‘वर्ल्ड पे’ कार्डचा उपयोग करण्यात आला. इंडिगो एयरलाइन्सचे तत्कालीन विमानतळ व्यवस्थापक चारू वर्मा यांनी याविषयी विशेष सत्र न्यायालयात साक्ष दिली.  पण हे कार्ड कुणाचे होते आणि कुणी टेरर फंडिंग केले याचा खुलासा करण्यात आलेला नाही. सरकारच्या दाव्यानुसार रईस शेख हा प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा सदस्य असून तो या संघटनेच्या सूचनेवरून नागपुरात आला होता.

संघ मुख्यालयाची केली होती रेकी

13 जुलै 2021 रोजी श्रीनगर येथून तो मुंबई मार्गे नागपूर आला आणि 15 जुलै 2021 रोजी नागपूर येथून दिल्ली मार्गे श्रीनगरला परत गेला. सुरक्षा यंत्रणेचे त्याच्या हालचालींवर लक्ष होते. सप्टेंबर 2021 मध्ये काश्मीर पोलिसांनी रईसला चौकशीसाठी ताब्यात घेतले त्यानंतर संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिर रेकीचा कट लक्षात आला. दहशतवाद पथकाने रईसला काश्मीर मध्ये अटक करून नागपुरात आणले. रईस शेख सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद, व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे तो न्यायालयात हजर होता. त्याने जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केले मात्र गुन्ह्याचे गांभीर्य पाहता त्याला कोणत्याच न्यायालयाने जामीन मंजूर केला नाही. तो दहशतवादी संघटनेसाठी काम करतो याचे ठोस पुरावे असल्याचे सरकारने सुनावणीच्या वेळी सांगितले.

कोण आहे रईस अहमद शेख?

रईस अहमद शेख हा 30 वर्षांचा आहे. तो जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामधील खाटी मोहल्ला येथील रहिवाशी आहे. त्याचे कुटुंब अत्यंत हालाखीच्या अवस्थेत जगत आहे. गरिबीतच रईसचे आयुष्य गेले. पण एका मित्राच्या मार्फत तो पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात आला. पैशाची चणचण दूर व्हावी यासाठी त्याने दहशतवादाचा मार्ग निवडला. जैश-ए-मोहम्मदचा पाकिस्तानातील हँडलर ओमर याने त्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याला दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण दिले. एप्रिल 2021 मध्ये रईस हा पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचा तळावर गेला होता. नागपूरमध्ये त्याच्यावर रेकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नागपूरमध्ये स्थानिक त्याला मदत करणार असे ठरले होते. पण त्याच्या हालचालीवर पूर्वीपासूनच यंत्रणांचे लक्ष होते.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात