AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? बच्चू कडूंच्या दाव्याने एकच खळबळ…म्हणाले राज्यात आजच सर्व्हे करा…सर्वाधिक पसंती याच नेत्याला

Bachchu Kadu big statements: राज्याच्या राजकारणात कधीकाळी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? यावरून धुमशान उडाले होते. त्यानंतर कुणाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला हे सर्वश्रूत आहे. पण आता राज्यातील जनतेची पसंती कोणत्या नेत्याला आहे यावरून शिवसेनेत दाखल झालेले बच्चू कडू यांनी मोठे भाष्य केले आहे.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? बच्चू कडूंच्या दाव्याने एकच खळबळ...म्हणाले राज्यात आजच सर्व्हे करा...सर्वाधिक पसंती याच नेत्याला
बच्चू कडू एकनाथ शिंदे, देवेद्र फडणवीस, सुनेत्रा पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 17, 2026 | 1:41 PM
Share

Bachchu Kadu on Eknath Shinde: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी आल्यावर हमखास विचारण्यात येतो. आता त्यामागील भावना काय हे जनतेला आणि नेत्यांनाच ठाऊक. पण देवाभाऊंच्या काळात या मुद्दावरून मोठा गदारोळ उडालेला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांनी यापू्र्वी आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत असा दावा केला होता. त्यांच्या दाव्याने त्याकाळी खळबळही उडाली होती. आता तसाच प्रकार पुन्हा समोर आला आहे. प्रहारमधून शिंदे सेनेत दाखल झालेले बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री म्हणून जनतेची पसंती कुणाला आहे, याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या की पक्षाचा अजेंडा पुढे रेटला हे मात्र त्यांनी तपशीलवार सांगतिले नाही.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून प्रार्थना

एकनाथ शिंदे हे रात्री दोन वाजता सामान्यांसाठी दरवाजा उघडणारे नेते आहेत. त्यामुळे अशा ताकतीचा नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा. सध्या सर्वेक्षण जरी केले तरी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत. असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे देवाला सकाळी घालण्यापेक्षा आपण जनतेच्या पुढे जाऊन एकत्रित एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना करू असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले. आमदार बच्चू कडू हे पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.

शिवसेनेने शेतकरी भूमिका स्पष्ट करावी

शिवसेनेला शेतकऱ्यांबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. विभागनुसार पीक पद्धती बदलत आहे. त्यामुळे विभागनुसार शिवसेनेने शेतकऱ्यांचे धोरण तयार केले पाहिजे. शिवसेनेने धोरण तयार केले तर त्या शेतकरी धोरणावर सरकारला कसे घेऊन जाता येईल. हे ठरवता येईल. असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

आमदार बच्चू कडू हे आज पंढरपुरात आले होते. पंढरपुरात आल्यावर आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी धोरणाविषयी बोलत असताना. शिवसेनेने शेतकरी धोरण स्पष्ट करावे अशी थेट आणि स्पष्ट मागणी केली आहे. तसेच , आपण आज विठ्ठलाचे दर्शन घेऊन विठ्ठलाकडे इतकेच प्रार्थना केली आहे. की सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याप्रतीच्या भावना चांगल्या आल्या पाहिजेत. ही प्रार्थना असल्याचेही आमदार बच्चू कडू म्हणाले.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?