AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदिती तटकरेंचं मंत्रीपद धोक्यात? कुणाला लॉटरी लागणार? त्या नेत्याचं नाव घेत रोहित पवार यांचा तो मोठा दावा

Rohit Pawar on Aditi Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून संशयाचा धुरळा उठल्याचा दावा करण्यात येत आहेत. पक्षात आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे. आमदार रोहित पवार हे सातत्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीतील कानगोष्टी बाहेर आणत आहेत. आताही त्यांनी असाच मोठा दावा केला आहे.

आदिती तटकरेंचं मंत्रीपद धोक्यात? कुणाला लॉटरी लागणार? त्या नेत्याचं नाव घेत रोहित पवार यांचा तो मोठा दावा
रोहित पवार, आदिती तटकरे, सुनेत्रा पवारImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 17, 2026 | 12:12 PM
Share

Rohit Pawar on Aditi Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस शिगेला पोहचल्याचा दावा करण्यात येत आहे. आमदार रोहित पवार हे सातत्याने अजितदादांच्या गोटातील घडामोडी आणि कानगोष्टी चव्हाट्यावर आणत आहेत. आता ही त्यांनी असाच एका मोठा दावा केला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना साईड लाईन केल्याची बातमी समोर आली. तर लागलीच या बातमीचे राष्ट्रवादीतून खंडणही करण्यात आले. सुनील तटकरे अथवा प्रफुल पटेल यांनी याविषयावर कोणतेही भाष्य करणे अद्याप टाळलेले आहे. पण पक्षातंर्गत काही तरी शिजतंय असा काहींचा दावा आहे. त्यात आमदार रोहित पवार यांच्या दाव्याने नवीन भर घातली आहे.

त्या ऑडिओ क्लिपमुळे वादाची ठिणगी

सध्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांमधील कथित ऑडिओ क्लिप वादाच्या केंद्रस्थानी असल्याचे बोलले जात आहे. त्यावर आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केलं आहे. दादा गेल्यानंतर १२ व्या दिवशी पत्रावर सही केली गेली, ती सही कोणाची होती. एका ऑडिओमध्ये या दोघांमधील एक नेता दादांवर खालच्या भाषेत बोलत होता. ही ऑडिओ क्लिप दुसरं पत्र जाण्याअगोदर सुनेत्राताईंना कुणीतरी ऐकवली. ज्या व्यक्तीकडे ऑडिओ क्लिप आहेत त्याच्याशी माझं फोनवरुन संभाषणं झालं. तो व्यक्ती मला ही ऑडिओ क्लिप व्हॉट्सअपवर पाठवत नाही. पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ती ऐकली आहे. अनुभवी नेत्यांना किंवा लोकांना सहजासहजी कुणी डावलत नसतं. खरंच हे पक्षाला प्रामाणिक असते तर त्यांचं पद का घालवलं असतं. या दोघांना डावलतायत हे आपल्याला पाहायला मिळतंय. जो संदेश जायला पाहिजे तो लोकांपर्यंत गेला आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. हा दावा तटकरे आणि पटेलांविषयी आहे की इतर कुणाविषयी ते संदर्भ देत आहेत हे जाणकारांना अचूक कळलं आहे.

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना विचारा

अजितदादा ऐकत कुणाचं नव्हते, ते फक्त कार्यकर्ते पदाधिकारी आणि महत्त्वाच्या लोकांचं ऐकायचे असे रोहित पवार म्हणाले. अजित पवारांसंदर्भात त्या ऑडिओ क्लिपमध्ये फार खालच्या लेव्हला जाऊन शब्द वापरले गेले. पार्थ आणि काकींनी पूर्ण क्लिप ऐकली असं आम्हाला समंजलं तेव्हा हा प्रश्न त्यांना विचारा, असे रोहित पवार म्हणाले.

आदिती तटकरेंचं मंत्रीपद जाणार?

सिल्व्हर ओकवर शरद पवार यांना कुणीही भेटू शकतं. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे शरद पवार यांनी सांगितले आहे. तर आदिती तटकरेंचं पद घालून सुनिल शेळकेंना पद दिलं जाऊ शकतं. राज्यमंत्र्याला मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, असा मोठा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुढच्या काही महिन्यात काही होऊ शकतं, असे ते म्हणाले.

तर विलिनीकरण झाले असते

अजितदादा धाडसी नेते होते. दादा विरोधीपक्षनेते होणार होते का? दादांची आणि आमची चर्चा बोलून फायदा नाही. विलिनीकरण नक्की होणार होतं. दोन्ही पक्ष एकत्रित राहिले तर दावेदारी करू शकले असते. भाजपाची साथ सोडून बाहेर येत असतील तर होऊ शकतं, नसेल येणार तर विलिनीकरण नाही होऊ शकत, असे रोहित पवार म्हणाले. दादाच्या अपघाताविषयी मनात शंका नसती तर आम्ही पाठपुरावा केला नसता. पारदर्शक पद्धतीने तपास होणं महत्त्वाचे आहे, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?