AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamilnadu CM Vijay : भारताच्या माजी पंतप्रधानांची हत्या करणाऱ्या प्रभाकरनला विजय यांनी वाहिली श्रद्धांजली

Tamilnadu CM Vijay : भारताच्या दिवंगत पंतप्रधानांची हत्या करणारा लिट्टेचा प्रमुख प्रभाकरनला तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री थलपती विजय यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टची चर्चा होत आहे. विजय यांच्या या कृतीवर काही राजकीय प्रतिक्रिया उमटू शकतात.

Tamilnadu CM Vijay : भारताच्या माजी पंतप्रधानांची हत्या करणाऱ्या प्रभाकरनला विजय यांनी वाहिली श्रद्धांजली
Vijay-prabhakaran
| Updated on: May 19, 2026 | 8:54 AM
Share

भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी आणि भारतीय सैनिकांची हत्या करणारा लिट्टेचा प्रमुख वी प्रभाकरन याची काल पुण्यतिथी होती. त्याला तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री सी जोसेफ यांनी श्रद्धांजली वाहिली. राजीव गांधी काँग्रेस पक्षाचे प्रमुख होते. याच काँग्रेस पक्षाच्या पाच आमदारंनी थलपती विजय यांच्या सरकारला पाठिंबा दिला. मागच्या आठवड्यात विजय यांचा शपथविधी सोहळा झाला, त्याला लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि राजीव गांधी यांचे सुपूत्र राहुल गांधी उपस्थित होते. थलपती विजय यांनी स्थापन केलेल्या तमिलगा वेत्री कषगम (TVK) पक्षाला तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. जनतेने विजय यांना थेट मुख्यमंत्रीपदी बसवलं. प्रभाकरनसाठी विजय यांनी x वर श्रद्धांजलीची पोस्ट केली. त्यात विजय यांनी मुल्लीवाइक्कल स्थानाचा उल्लेख केला आहे.

मुल्लीवाइक्कल स्थानाचा उल्लेख करत लिहिलय की, “आम्ही मुल्लीवाइक्कलच्या आठवणी आमच्या मनात कायम ठेवू. समुद्रापलीकडे राहणाऱ्या आमच्या तामिळ बंधू-भगिनींच्या हक्कासाठी आम्ही नेहमी त्यांच्यासोबत उभे राहू. 2009 मध्ये मुल्लीवाइक्कल येथे प्रभाकरनवर श्रीलंकन सैन्याने गोळी झाडली होती” 1991 साली या LTTE ने भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या घडवून आणली होती. भारतात लिट्टेवर बंदी आहे. या प्रकरणात प्रभाकरन मुख्य आरोपी होता. जगभरात पसरलेला तामिळ समुदाय आणि भारतात राहणारे तामिळी 18 मे हा ‘मुल्लीवाइक्कल स्मरण दिवस’ म्हणजे ‘तमिळ नरसंहार स्मरण दिवस’ म्हणून साजरा करतात. 2009 साली श्रीलंकेतील गृहयुद्ध समाप्त झालं. या दिवशी मृत्यूमुखी पडलेल्या हजारो तामिळ नागरिकांचं स्मरण केलं जातं. मुल्लीवाइक्कल या किनारपट्टीवरील गावावर श्रीलंकन सैन्याने अंतिम जोरदार प्रहार केला होता. यात प्रभाकरनसह अनेक नागरिक मारले गेले होते.

किती हजार तामिळ नागरिक मारले गेले?

मुल्लीथिवु जिल्ह्यात ‘मुल्लीवईक्कल’ हे किनारपट्टीवर वसलेलं छोटसं गाव होतं. इथेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलम (लिट्टे) प्रमुख वी प्रभाकरन मारला गेला. त्याच्या मृत्यूने तीन दशकापासून सुरु असलेलं तामिळनाडूतील गृहयुद्ध समाप्त झालं होतं. संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार, युद्धाच्या अंतिम टप्प्यात जवळपास 40 ते 70 हजार तामिळ नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. मुल्लीवईक्कलमध्ये श्रीलंकन सैन्याने यु्द्ध गुन्हे केले. नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले होते. म्हणून हा दिवस ‘मुल्लीवाइक्कल स्मरण दिवस’ म्हणून तामिळ बांधव साजरा करतात.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय