हुवाई लाँच करणार भारतात 2 लाख रुपयांचा फोल्डेबल फोन

हुवाई लाँच करणार भारतात 2 लाख रुपयांचा फोल्डेबल फोन

नवी दिल्ली : चिनी स्मार्टफोन कंपनी हुवाई काही महिन्यात भारतात फोल्डेबल स्मार्टफोन Huawei Mate X लाँच करणार आहे. हा फोन वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र आता भारतात हुवाई आपला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार असल्याने याचा किती फरक भारतीय बाजारपेठेत पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. फोल्डबेल फोन असल्याने भारतीय ग्राहकही नक्कीच या फोनकडे आकर्षित […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:14 PM

नवी दिल्ली : चिनी स्मार्टफोन कंपनी हुवाई काही महिन्यात भारतात फोल्डेबल स्मार्टफोन Huawei Mate X लाँच करणार आहे. हा फोन वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र आता भारतात हुवाई आपला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार असल्याने याचा किती फरक भारतीय बाजारपेठेत पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. फोल्डबेल फोन असल्याने भारतीय ग्राहकही नक्कीच या फोनकडे आकर्षित होतील.

Huawei Mate X या फोनची किंमत 2 हजार 299 युरो आहे. तर भारतीय रुपयात या फोनची किंमत अंदाजे 1 लाख 80 हजार रुपये होते. मात्र भारतात टॅक्समुळे या फोनची किंमत 2 लाख रुपयेपर्यंत असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही सॅमसंगने आपला फोल्डेबल फोन लाँच केला आहे. मात्र त्याची किंमत या फोनपेक्षा कमी आहे.

Huawei Mate X मोबाईल भारतात एकाच रंगात ब्लू व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असणार आहे. Huawei Mate X मध्ये 5जी कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. हा फोन तुम्ही 5जी नेटवर्कवर वापरू शकता. याआधीही अनेक कंपन्यांनी फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. त्यामध्येही अनेक वेगवेगळे फीचर देण्यात आले होते. मात्र हुवाईने लाँच केलेल्या फोनची किंमत पाहून नक्कीच कंपनीने काहीतरी वेगळं दिलं असावे अशी चर्चा सध्या सुरु आहे.

सॅमसंग आणि हुवाई दोन्ही कंपनीने फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. Galaxy Fold हा फोन सॅमसंगने पहिले लाँच केला आहे. पण सॅमसंगच्या फोनची किंमत Mate X पेक्षा कमी आहे. सॅमसंगने Galaxy Fold भारतात लाँच कधी करणार याबद्दल अजून काही माहिती दिलेली नाही. Mate X च्या लाँचनंतर कदाचीत सॅमसंगही आपला Galaxy Fold भारतात लाँच करु शकते.

स्पेसिफिकेशन

8 इंचाचा OLED डिस्प्ले फोल्ड केल्यावर 6.6 इंच डिस्प्ले

हुवाईमध्ये Kirin 980 प्रॉसेसर

बॅटरी 4,500mAh

प्रायमरी कॅमेरा 40 मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा 16 मेगापिक्सल आणि तीसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल

फोनसोबत 55W सुपरचार्ज अॅडोप्टर

8 जीबी रॅम, 512 जीबी इंटरनल स्टोअरेज

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें