
भारतातील करोडो लोक इंस्टाग्राम वापरतात. टिकटॉकवर बंदी आल्यापासून, इंस्टाग्राम रील्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लोक रात्रंदिवस रील्स स्क्रोल करताना पहायला मिळता. अनेकांना याची सवय लागली आहे. याचा वाईट परिणाम शरिरावर आणि मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे. अशातच आता इंस्टाग्राम एक नवीन ऑटो स्क्रोल फीचर आणणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे रील्स पाहण्याच्ये व्यसन आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ऑटो स्क्रोल म्हणजे काय?
समोर आलेल्या माहितीनुसार काही नेटकऱ्यांनी फेसबुक, थ्रेड्स आणि एक्सवर स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यात इंस्टाग्राममध्ये ऑटो स्क्रोल नावाचा एक नवीन पर्याय दिसत आहे. हे फीचर अॅक्टिव्हेट केल्यावर तुम्हाला रील स्क्रोल कराव्या लागणार नाहीत. एक रील संपल्यावर लगेच दुसरी रील आपोआप प्ले होईल. यामुळे युजर्सचे रील स्क्रोल करण्याचे कष्ट वाचणार आहे. हे फीचर नेटफ्लिक्सच्या ऑटो प्ले फीचरसारखे असण्याची शक्यता आहे.
ही बातमी खरी आहे का?
इंस्टाग्राम ऑटो रील स्क्रोलबाबत इंस्टाग्रामने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या या फीरचची फक्त अफवा पसरल्याचे दिसत आहे. मात्र आगामी काळात कंपनीकडून या फीचरची घोषणा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
हे फीचर आल्यावर काय परिणाम होणार?
इंस्टाग्रामने ऑटो स्क्रोल फीचर आणले तर युजर्सच्या आरोग्याला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचा स्क्रीन टाईम वाढेल, यामुळे डोळ्याची जळजळ, मानसिक थकवा जाणवू शकतो. त्याचबरोबर मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये सोशल मीडियाचे व्यसन आणखी वाढू शकते. याचा फटका आरोग्याला बसण्याची शक्यता आहे.
ऑटो स्क्रोल फीचर हे सोशल मीडियाच्या इतिहासातील सर्वात वाईट फीचर ठरू शकते. यामुळे युजर्सच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. त्यामुळे हे फीचर न आल्यास त्याचा फायदा सर्वसामान्यांच्या आरोग्याला होण्याची शक्यता आहे.
2 अब्ज लोक इंस्टाग्राम वापरतात
जगातील तब्बल 2 अब्ज लोक इंस्टाग्राम वापरतात. हा आकडा जगातील लोकसंख्येच्या सुमारे 25–28 टक्के आहे. 2025 हे वर्ष संपेपर्यंत हा आकडा 2.35 अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.