
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या अॅप्सची लोकप्रियता गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बहुतांश लोकं इंस्टाग्रामवर रील्स बघत असतात. तसेच अलीकडच्या काळात सामान्य लोकांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण इंस्टाग्रामवर सक्रिय आहेत. अशातच तुम्ही सुद्धा इंस्टाग्राम वापरत असाल आणि खूप सक्रिय असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही दिवसभर अशा अनेक चुका करता ज्यामुळे तुमचे इंस्टाग्रामवरील खाते ब्लॉक होण्याचा धोका अधिक वाढू शकतो. जर इंस्टाग्रामच्या एकाही नियमांचे व मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन झाले तर, लाखो फॉलोअर्स असलेल्या तुमच्या खात्याला इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म सोडत नाही. तुमचे खाते निलंबित किंवा ब्लॉक होण्यापासून कसे रोखता येईल ते येथे जाणून घ्या. याशिवाय एटूंचे बंद केलेले खाते कसे सुरु करता येऊ शकतात याबद्दल जाणून घेऊयात?
जर तुमचे खाते इंस्टाग्राम कम्युनिटीने ठरवलेल्या तत्त्वांचे पालन करत नसेल तर ते खाते बॅन केले जाते. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची अश्लील कंटेंट शेअर केली तर तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. याशिवाय जर तुम्ही तुमच्या पोस्ट किंवा रील्सवर प्रतिबंधित हॅशटॅग वापरत असाल तर तुम्हाला अकाउंट बॅनची सूचना देखील मिळू शकते. याशिवाय तुमचे इंस्टाग्राम प्रोफाइल खोटे असल्याचे सिद्ध झाले किंवा ते घोटाळ्याचा भाग असल्याचे आढळले तर तुमच्या अकाउंटवरही कारवाई केली जाऊ शकते.
तुम्ही इंस्टाग्रामवर काहीही पोस्ट करू शकता. परंतु ते Instagram च्या कम्युनिटीने ठरवलेल्या तत्त्वांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या अकाउंटवर एखादा व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर करताना कोणतेही प्रतिबंधित हॅशटॅग वापरू नका. देशाविरुद्ध किंवा राजकीय मत दर्शविणारी कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळा.
काही कारणास्तव तुमचे खाते बंद केले गेले असेल तर यासाठी प्रथम तुमचे इंस्टाग्राम उघडा. सेटिंग्ज मध्ये जा आणि हेल्प सेंटरवर क्लिक करा. येथे तुम्हाला “My Instagram account has been disabled” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. यानंतर तुमचे खाते तपशील भरा. यामध्ये वापरकर्त्याचे नाव, ईमेल, फोन नंबर यासारखे सर्व तपशील काळजीपूर्वक भरा. बंद होण्याचे कारण निवडा. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे तुमचे खाते ज्या पर्यायासाठी बॅन केले गेले आहे तो पर्याय निवडा. हे केल्यानंतर तुमचे अपील सबमिट करा. काही दिवसांनी पुन्हा तुमचं अकाउंट सुरु होईल.