iPhone 15 फक्त 37,949 रुपयात खरेदी करा, ही आफलातून ट्रिक्स वापरा; मोबाईल तुमच्या खिशात

फ्लिपकार्टवर आयफोन 15 ची किंमत 16% सवलतीसह 58,499 रुपये झाली आहे. पण एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतल्यास ही किंमत 37,949 रुपयांपर्यंत कमी करता येते. जुन्या आयफोन 14 प्लस सारख्या फोन एक्सचेंज केल्यास 22,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते. आयफोन 15 मध्ये A16 बायोनिक चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 2,000 निट्स पीक ब्राइटनेस असलेला डिस्प्ले आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.

iPhone 15 फक्त 37,949 रुपयात खरेदी करा, ही आफलातून ट्रिक्स वापरा; मोबाईल तुमच्या खिशात
आयफोन 15 मिळवा स्वस्तात
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 2:56 PM

सध्या आयफोनचा जमाना आहे. बहुतेकांच्या हातात आयफोन असतोच असतो. त्यातही तरुणांच्या हातात तर आयफोन नसेल तर नवलच. त्यामुळे कितीही मोबाईल बाजारात आले तरी अॅप्पल आणि आयफोनची क्रेझ कमी होणार नाही. अॅप्पलच्या iPhone 15 (ब्लॅक, 128 GB) ची ओरिजिनल किंमत 69,900 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवर त्यावर 16% सूट मिळून त्याची किंमत 58,499 रुपये झाली आहे. त्याचसोबत, अनेक बँक ऑफर देखील आहेत. याशिवाय, iPhone 15 ला एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास त्याची किंमत आणखी कमी होऊन 37,949 रुपये होऊ शकते. एक्सचेंज ऑफरच्या मदतीने ग्राहक अॅपलच्या या फ्लॅगशिप फोनला खूप कमी किंमतीत खरेदी करू शकतात.

फ्लिपकार्टची एक्सचेंज ऑफर काय?

फ्लिपकार्टवर iPhone 15 वर 16% सूट दिली जात आहे. पण ग्राहक एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकतात. उदाहरणार्थ, ग्राहक जर iPhone 15 खरेदी करण्यासाठी त्यांच्या जुन्या iPhone 14 Plus फोनला एक्सचेंज ऑफरमध्ये देत असतील तर त्यांना 20,550 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. यासाठी, तुमच्या जुन्या आयफोनची स्थिती चांगली असावी लागेल. जर सगळं काही व्यवस्थित असेल, तर ग्राहक iPhone 15 फक्त 37,949 रुपये मध्ये खरेदी करू शकतात

हे सुद्धा वाचा

iPhone 15 चे स्पेसिफिकेशन

अॅपलने डायनॅमिक आयलँड तंत्रज्ञानाचा वापर iPhone 15 मध्ये केला आहे. त्यामुळे फोनचा लुक खूप प्रीमियम झालाय. त्यात 2000 निट्स पीक ब्राइटनेस असलेला 6.1 इंचाचा डिस्प्ले मिळतो. स्टोरेजसाठी 128 GB, 256 GB, आणि 512 GB च्या पर्यायांचा ग्राहकांना उपलब्धता आहे. iPhone 15 मध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो क्वाड सेंसर्स आणि जलद ऑटोफोकससाठी 100% फोकस पिक्सल्ससह येतो. iPhone 15 वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो. त्यात हेक्सा-कोर Apple A16 बायोनिक प्रोसेसर देखील आहे. त्यामुळे आयफोनला नवे OS अपडेट्ससह कार्यक्षम बनवता येते.

असे आहेत फिचर्स

डिस्प्ले- 6.1 इंच XDR OLED, ऑलवेज ऑन डिस्प्ले

रिफ्रेश रेट- 60Hz

पीक ब्राइटनेस- 2000 निट्स

प्रोसेसर- A16 बायोनिक चिपसेट

स्टोरेज- 128GB, 256GB, 512GB

रियर कॅमरा- 48MP प्राइमरी + 12MP अल्ट्रा वाइड

फ्रंट कॅमरा- 12MP

बॉडी मटेरियल- फ्रंटमध्ये सेरेमिक शील्ड, मॅटे फिनिशच्यासह ग्लास बॅक पैनल

कलर्स- ब्लॅक, ब्लू, ग्रीन, येलो, पिंक

आयपी रेटिंग- IP68

सुरुवाती किंमत– 79,900 रुपये (128GB)

राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.