
iPhone Offer : विजय सेल्सने Apple Days Sale ची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅपल डेज सेल्सच्या दिवसांत आयफोन तसेच अॅपलच्या इतर प्रोडक्ट्सवर मोठी ऑफर देण्यात येत आहे. या सेलमद्ये आयफोन, आयपॅड, मॅकबुक, अॅपल वॉच, एअरपॉड्स तसेच इतर उपकरणांवर मोठे डिस्काऊंट दिले जात आहे. यावेळी विजय सेल्सच्या या अॅपड डेज सेलमध्ये आयफोनवर देण्यात आलेल्या डिस्काऊंटने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या सेलमध्ये आयफोन 16 आणि आयफोन 17 खूपच कमी किमतीत विकला जात आहे. ही ऑफर विजय सेल्सच्या रिटेल स्टोअर्स आणि ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध आहे.
Apple Days Sale मध्ये iPhone सर्वात जास्त सूट दिली जात आहे. iPhone च्या मॉडल्सवर ICICI Bank आणि Axis Bank कार्डने पेमेंट केले तर लगेच 4,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काऊंट मिळत आहे. यासह जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन घ्यायचा असेल तर त्यावर 9,000 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट दिले जात आहे. iPhone 17 (256GB) या फोनची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये आहे. सेलमधील सुट ग्राह्य धरली तर हा फोन फक्त 78,900 रुपयांना मिळत आहे. तर iPhone 16 सीरीजच्या फोनची किंमत 59,990 रुपयांपासून सुरू झालेली आहे.
विजय सेल्समध्ये iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max या प्रो सिरीजच्या फोनवरदेखील मोठी सूट देण्यात आली आहे. ही सूट ग्राह्य धरली तर iPhone 17 Pro हा फोन आता 1,22,990 रुपये आणि Pro Max हा फोन 1,35,990 रुपयांना मिळत आहे. iPhone Air (256GB) हा फोन तुम्हाला फक्त 91,990 रुपयांत खरेदी करता येईल. या प्रो मॉडेलवरील बँक ऑफर आणि एक्स्जेंच बोनस पकडून हा फोन तुम्हाल आणखी स्वस्त मिळू शकतो.
दुसरीकडे मॅकबुक, आयपॅड तसेच अॅपल वॉच आणि एअर पॉडवरदेखील मोठी सूट दिलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे.