नव्या iPhone 18 साठी मोठी प्रतिक्षा?, आयफोन चाहत्यांचा हिरमोड,काय घडले ?
नव्या आयफोन मॉडेलची वाट पाहणाऱ्या आयफोन चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. आता नवा आयफोन 18 ची प्रतिक्षा आणखी लांबली आहे.

Apple Delays iPhone 18 : Apple संदर्भात या आठवड्यात मोठी आश्चर्यकारक बातमी आहे. एका बातमीनुसार यावर्षी आयफोन 18 लाँच होणार नाही. याशिवाय कंपनी iOS Android ला मान्यता देणार आहे.आणि MacBook लाईनअपमध्ये मोठा बदलाची तयारी सुरु आहे. यासोबतच Apple च्या AI रणनिती आणि गेम्स एप संदर्भातील प्रश्न निर्माण झाले आहेत.
2026 मध्ये iPhone 18 येणार नाही
बातमीनुसार Apple 2026 मध्ये स्टँडर्ड iPhone 18 लाँच होणार नाही. कंपनी केवळ iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि फोल्डेबल iPhone ला आपल्या पारंपारिक फॉल लाँच इव्हेंटमध्ये सादर करणार आहे.बेस iPhone 18 ला आता साल 2027 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. या रणनीतीने एप्पल आता आधी हाय – परफॉर्मेंस Pro मॉडेल्सवर फोकस करु इच्छीत आहे.
iOS आता Android स्वीकारणार
एप्पल पहिल्यांदाच आपल्या इकोसिस्टीमसाठी उघडणार आहे. iOS 26.3 अपडेटमध्ये iPhone मधून Android वर डेटा ट्रान्सफर करण्याचा ऑफिशियल फीचर मिळेल. युजर्स कोणत्याही थर्ड पार्टी एपशिवाय सहज प्लॅटफॉर्म बदल शकतील. गुगल देखील एंड्रॉईडमध्ये या प्रकारचे फिचर आणत आहे. ज्यामुळे दोन्ही सिस्टीम दरम्यान ट्रान्सफर सोपी होईल. म्हणजेच लवकरच आयफोनमधून एड्रॉईड आणि एड्रॉईडमधून आयफोन स्विच करणे सोपे होणार आहे.
2026 मध्ये MacBook लाईनअपमध्ये नवे काय ?
एप्पल 2026 मध्ये तीन मॅकबुक व्हेरिएट्सवर काम करत आहे. यात MacBook Air, बजेट 12 इंची MacBook आणि हायएण्ड MacBook Pro चा समावेश आहे. रिपोर्ट्सच्या मते 14 इंचाच्या आणि 16 इंचाच्या MacBook Pro मध्ये M5 Pro आणि M5 Max चिप्स दिल्या जातील. डिझाईनमध्ये मोठा बदल होणार नाही. परंतू परफॉर्मेंस,SSD स्पीड आणि मेमरी बँडविड्थमध्ये सुधारणा पाहायला मिळेल.
अॅपलची वेगळी AI स्ट्रॅटेजी
इतर कंपन्या AI मध्ये मोठी गुंतवणूक करत असताना, अॅपलने याकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. एआयमध्ये अॅपल गुगल आणि सॅमसंगपेक्षा खूपच मागे आहे. AI बबलबद्दल बाजारपेठेत संशय वाढत आहे. AI वर कमी खर्च करून अॅपलने $१३० अब्ज पेक्षा जास्त रक्कम राखीव ठेवली आहे. भविष्यात एआय स्टार्टअप्सना खरेदी करण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत भागीदारी करण्यासाठी ही स्ट्रॅटेजी असावी असे म्हटले जात आहे.
iOS 26 चे गेम्स एपची निराशा
iOS 26 मध्ये समाविष्ट केलेले नवीन गेम्स एप चाहत्यांना विशेष प्रभावित करणारे नाहीत.अहवाल असे दर्शवितात की एपमध्ये गेमिंग अनुभवापेक्षा जास्त जाहिराती आणि मायक्रो-ट्रांझक्शन आहेत. Apple Arcade वर जास्त अवलंबून राहणे देखील युजरना निराश करत आहेत. म्हणूनच आयफोनवर गेमिंगबद्दल नाराजी कायम आहे.
