AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iPhone 18 Pro चे भारतीय दिवाणे, रात्रीपासूनच मुंबईत APPLE स्टोअर बाहेर लागली रांग

Apple iPhone 18 Pro: ॲपलचा आयफोन 18 Pro खरेदीसाठी स्टोअरसमोर मोठी गर्दी झाली. आयफोनचे वेड यानिमित्ताने समोर आले. अनेक भारतीय आयफोनचे दिवाणे आहेत हे दिसून आले. रात्रीपासूनच मुंबईसह दिल्लीतील स्टोअरसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या.

iPhone 18 Pro चे भारतीय दिवाणे, रात्रीपासूनच मुंबईत APPLE स्टोअर बाहेर लागली रांग
आयफोन 18 प्रो Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 18, 2026 | 7:37 AM
Share

ॲपलचा बहुप्रतिक्षित iPhone 18 Pro ची क्रेझ पुन्हा दिसली. दिल्लीसह मुंबईतील ॲपल स्टोअरसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. काही युझर्सनी तर रात्रीच स्टोअरसमोर मुक्का ठोकला. आयफोनचे भारतीय दिवाणे असल्याचे दिसले. दिल्लीतील साकेतमधील प्रसिद्ध सिलेक्ट सिटीवॉक मॉलमध्ये ॲपल स्टोरबाहेर iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदीसाठी एकच गर्दी उसळली. ग्राहकांच्या, खरेदीदारांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. तर खरेदीसाठी पहिल्या दहात येण्यासाठी काहींनी रात्रीच स्टोअरसमोर मुक्काम ठोकला.

पहाटेपासूनच ग्राहक रांगेत

ॲपल स्टोअरबाहेर आज भल्या पहाटेपासूनच लांबच लांब रांगा दिसल्या. अनेक जणांनी रात्र जागून काढली. तर काहींनी भल्या पहाटेच मुंबई आणि दिल्लीतील स्टोअरबाहेर हजेरी लावली. ॲपल स्टोअरमध्ये सकाळी 8 वाजेपासूनच आयफोनच्या अधिकृत विक्रीला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच आयफोन प्रेमींनी खरेदीसाठी गर्दी केली. टेक रिव्ह्युअर्स, कंटेंट क्रिएटर्स यांनी तर रात्रीपासूनच या स्टोअरसमोर मुक्काम ठोकला. काही जण भल्या पहाटे या ॲपल स्टोअरसमोर दाखल झाले. ॲपलच्या या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनमधील प्रगत कॅमेरा फीचर्स, अपग्रेटेड परफॉर्मन्स आणि नव्या डिझाईनविषयी ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे दिसले.

मुंबईत ॲपल स्टोअरसमोर जत्राच भरली

दिल्लीतच नव्हे तर मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेरही खरेदीदारांची एकच गर्दी दिसली. स्टोअरचे दरवाजे उघडण्यापूर्वीच ग्राहकांची मोठी गर्दी झाली. जणू या स्टोअरसमोर ग्राहकांची जत्राच भरली. अनेक जण रांगेत उभे होते. अनेक ग्राहकांनी आधीच ऑनलाईन प्री-बुकिंग केले होते. ते आता त्यांच्या ड्रिम फोनची डिलव्हरी घेण्यासाठी आणि स्टोअर उघडण्याची वाट पाहत भल्या पहाटेपासून रांगेत उभे आहेत.

iPhone 17 सह iPhone 16 ची नवीन किंमत काय?

iPhone 17 हा भारतात 82,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तर 256GB चे व्हेरिएंट 99900 रुपयांना आहे. 512 जीबी मॉडलसाठी 1 लाख 24 हजार 900 रुपये मोजावे लागतील. कंपनीने बेस व्हेरिएंटमध्ये 17 हजार रुपयांची वाढ केली आहे. iPhone 16 ची किंमत 79,900 रुपये आहे. तर 128GB मॉडेल आता 89900 रुपये इतकी आहे. दोन्ही फोनच्या किंमतीत कंपनीने जवळपास 10 हजार रुपयांची वाढ केली आहे.  नवीन आयफोनसह जुन्या मॉडलच्या खरेदीसाठी ग्राहक उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी रोख रक्कम घेऊन अनेक जण तयार आहेत. तर काही जण ईएमआयचा पर्याय शोधत आहेत.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर