7000mAh बॅटरी असलेला iQOO चा हा फोन लाँच, 7 वर्षांपर्यंत मिळतील अपडेट्स

iQOO ब्रँडचा हा फोन भारतात लाँच झाला आहे. हा फ्लॅगशिप स्मार्टफोन पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर आणि 7000 mAh बॅटरीने सुसज्ज आहे. चला तर मग दमरदार फीचर असलेल्या फोनची किंमत जाणून घेऊयात.

7000mAh बॅटरी असलेला iQOO चा हा फोन लाँच, 7 वर्षांपर्यंत मिळतील अपडेट्स
iQOO 15
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Apr 02, 2026 | 11:06 AM

भारतात iQOO 15 Apex हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. हा नवीनतम iQOO स्मार्टफोन अनेक वैशिष्ट्यांसह येतो, ज्यामध्ये पॉवरफूल प्रोसेसर, सात वर्षांची सुरक्षा आणि पाच वर्षांचे OS अपडेट्स यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त फोनमध्ये 2K M14 OLED डिस्प्ले आणि सुपरकंप्यूटिंग Q3 चिप आहे. चला तर मग आजच्या लेखात या हँडसेटची किंमत आणि प्रमुख फिचर्स कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

भारतातील iQOO 15 Apex स्मार्टफोनची किंमत

iQOO 15 चा हा व्हेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेल 72 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. 16GB रॅम आणि 512GB व्हेरिएंटची किंमत 79 हजार 999 रूपये आहे. निवडक बँक कार्डांवर 6,000 रूपयांची सरळ सूट उपलब्ध आहे, ज्यामुळे या फोनची किंमत 66 हजार 999 रूपयांपर्यंत कमी होते. जे फोनची प्री-बुकिंग करतील त्यांना 1,899 किमतीचा एक मोफत iQOO TWS देखील मिळेल.

या ब्रँडेड फोनच्या उपलब्धतेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हा फोन 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता कंपनीच्या वेबसाइटवर, तसेच ॲमेझॉन, विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि निवडक रिटेल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. स्पर्धेच्या बाबतीत हा फोन MOTOROLA Signature, Google Pixel 10, OPPO Find X9 आणि OPPO Reno 15 Pro 5G यांसारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

iQOO 15 Apex स्मार्टफोनचे फिचर्स

स्क्रीन: या फोनमध्ये 6.85-इंचाचा सॅमसंग 2K M14 LED OLED डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे.

चिपसेट: हा फ्लॅगशिप फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि उष्णता बाहेर टाकण्यासाठी यात 8000mm2 कूलिंग सिस्टम आहे.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 7000 mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे, जी 100 वॅट फ्लॅशचार्ज आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा: फोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूम असलेला 50MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आहे.

सॉफ्टवेअर: हा नवीनतम फोन अँड्रॉइड 16 वर आधारित OriginOS 6 वर चालतो. तसेच कंपनीकडून या हँडसेटला 7 वर्षांपर्यंत अपडेट्स मिळत राहतील.

Follow Us