iQOO लाँच करणार 25000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये आतापर्यंतचा सर्वात फास्ट फोन, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन?

| Updated on: Apr 10, 2022 | 1:23 PM

चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी आयकू (iQOO) एक परवडणारा फोन सादर करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी, एका अहवालात असे समोर आले होते की ही कंपनी आयकू झेडएक्स (iQOO ZX) लाइनअप अंतर्गत एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे.

iQOO लाँच करणार 25000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये आतापर्यंतचा सर्वात फास्ट फोन, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन?
iQoo Z6 Pro 5G
Image Credit source: iQoo
Follow us on

मुंबई : चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी आयकू (iQOO) एक परवडणारा फोन सादर करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वी, एका अहवालात असे समोर आले होते की ही कंपनी आयकू झेडएक्स (iQOO ZX) लाइनअप अंतर्गत एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे, ज्याला आयकू झेडएक्स प्रो 5 जी (iQOO Z6 Pro 5G) असे नाव दिले जाऊ शकते. जे अलीकडेच लाँच झालेल्या iQOO Z6 5G चे हाय एंड व्हर्जन असेल. दरम्यान ब्रँडने आता अधिकृतपणे या स्मार्टफोनच्या लाँचिंगची पुष्टी केली आहे. iQOO कंपनीने सध्या #iQOORaidNights स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि कंपनीने त्यांच्या आगामी स्मार्टफोन iQOO Z6 Pro 5G चा टीझरदेखील नुकताच रिलीज केला आहे. Twitter वर, ब्रँडने पुष्टी केली आहे की Z6 Pro लाँच होत आहे आणि नेटिझन्सना स्मार्टफोनला पॉवर देणार्‍या चिपसेटबाबत अंदाज लावण्यास सांगितले आहे.

या चिपसेटचा अचूक अंदाज लावणाऱ्या दोन भाग्यवान विजेत्यांना कंपनी iQOO Z6 Pro 5G मोफत देईल. दरम्यान, iQOO Esports Youtube चॅनेलवरील अलीकडील रेड नाईट्स व्हिडीओने फोनचे काही इंटर्नल डिटेल्स उघड केले आहेत. Z6 Pro हा 25000 रुपयांच्या आत सर्वात वेगवान फोन असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हा फोन 25,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये येईल. तसेच, त्याची विक्री केवळ Amazon India द्वारे केली जाईल. याशिवाय, हँडसेटचा AnTuTu स्कोर समोर आला आहे.

iQOO Z6 Pro 5G ने बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर 5,50,000 गुण मिळवले आहेत. याशिवाय फोनच्या इतर फीचर्सचाही अंदाज लावला जात आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G SoC सह लाँच केला जाईल, असे म्हटले आहे. हा iQOO Z5 सारखाच चिपसेट आहे जो मागील वर्षी लॉन्च झाला होता. असे दिसते की iQOO जुना चिपसेट कायम ठेवून नवीन डिझाइनसह सिरीज सुधारू इच्छित आहे. फोनमध्ये इतर सेगमेंटमध्येदेखील काही सुधारणा अपेक्षित आहेत.

इतर बातम्या

गुगलने बंदी घातलेले ‘हे’ अॅप्स्‌ तुमच्या मोबाईलमध्ये नाहीत ना?

सोशल मीडियात खळबळ : हवामान खात्याचेही ट्विटर अकॉउंट हॅक

स्कूटर देतो पण, कामावर या… गुगल कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी आमिष