Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगलने बंदी घातलेले ‘हे’ अॅप्स्‌ तुमच्या मोबाईलमध्ये नाहीत ना?

गुगलने आपल्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्म असलेल्या प्ले स्टोअरवरील अनेक अॅप्स्‌वर बंदी घातली आहे. या अॅप्स्‌च्या माध्यमातून वापरकर्त्यांची माहिती व फोन नंबरची हेरगिरी होत असल्याचे सांगितले जात आहे. बंदी घातलेल्या काही अॅप्स्‌मध्ये मुस्लीम प्रेयर अॅप्स्‌चा सहभाग असून त्याला 10 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोडींग आहे.

गुगलने बंदी घातलेले ‘हे’ अॅप्स्‌ तुमच्या मोबाईलमध्ये नाहीत ना?
गुगलने आपल्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्म असलेल्या प्ले स्टोअरवरील अनेक अॅप्स्‌वर बंदी घातली आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 1:16 PM

तंत्रज्ञान क्षेत्रातली मोठी कंपनी असलेली गुगल (google) नेहमी आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असते. त्यामुळे आपल्या पातळीवर होत असलेल्या सर्व छोट्यामोठ्या घडामोडींवर गुगलकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असते. याचमुळे गुगलच्या सेफ्टीविषयक फंक्शनमध्ये वारंवार बदलदेखील केले जात असतात. नुकतेच गुगलने आपल्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्म प्ले स्टोअरवरील अनेक अॅप्स्‌वर बंदी (banned apps) घातली आहे. या अॅप्स्‌च्या माध्यमातून वापरकर्त्यांची माहिती व फोन (Phone) नंबर चोरी होत असल्याचे सांगितले जात आहे. बंदी घातलेल्या काही अॅप्स्‌मध्ये मुस्लीम प्रेयर अॅप्स्‌चा सहभाग असून त्याला 10 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड केले गेले आहे.

याशिवाय यात बारकोड स्कॅनिंग अॅप्स आणि एक हायवे स्पीड ट्रेप डिटेक्शन अॅपचा समावेश आहे. क्यूआर कोड स्कॅनिंग अॅपमध्ये डेटा स्क्रेपिंग कोड स्पॉट करण्यात आले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका रिपोर्टनुसार, ज्या अॅप्स्‌वर बंदी घातली आहे, ते सर्व अॅप्स्‌ वापरकर्त्याचे लोकेशन, ई-मेल, मोबाईल क्रमांक, जवळपासच्या डिव्हाईसचे पासवर्ड गोळा करीत होते. रिसर्चमध्ये हेदेखील उघड झालेय की, मेजरमेंट सिस्टीम S. De R. L व्दारे तयार करण्यात आलेला एक SDK देखील व्हाट्सअप डाउनलोडींगसाठी स्कॅन करुन शकतो.

कंपनी व्हर्जिनिया डिफेन्स कॉन्ट्रॅक्टरशी जोडलेली आहे, ज्याने वापरकर्त्यांना त्यांच्या अॅप्समधून डेटा काढण्यासाठी त्यांचा स्वतःचा कोड विकसित करण्यासाठी पैसे दिल्याची माहिती आहे. दरम्यान, ‘डब्ल्यूएसजे’च्या एका रिपोर्टनुसार, ज्या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, त्या अॅप्समधील कोडचे संशोधन सर्ज एंगेलमेन व रियरडन या दोन रिसर्चर्सने केली आहे. त्यांनी AppCensus नावाच्या एका संघटनेची निर्मिती केली आहे. या संघटनेव्दारे गुप्तता आणि संरक्षणात्मक पातळीवर अॅप्सची पडताळणी केली जात असते.

दरम्यान, ज्यावेळी गुगलला मेलिसियस सॉफ्टवेअरच्या बाबतीत समजले त्याच वेळी 25 मार्चला कंपनीने आपल्या प्ले स्टोअरवरील अनेक अॅप्स्‌वर बंदी घातली होती. गुगलचे प्रवक्ते स्कॉट वेस्टओव्हर यांनी सांगितले, की जर मेलिसियस सॉफ्टवेअर हटवण्यात आले तर संबंधित अॅप्सचे पुन्हा लिस्टींग (नोंदणी) शक्य आहे, तसेच गुगल कधीही अॅप्स बनवणार्यांची चिंता करीत नाही. गुगलने तयार केलेल्या नियमांनुसार अॅप्स काम करीत नसतील तर त्यांच्यावर वेळीच योग्य कारवाई केली जाईल. वापरकर्त्यांच्या गुप्ततेला व सुरक्षेला नेहमी प्राधान्य देण्यात येईल.

संबंधित बातम्या : 

स्कूटर देतो पण, कामावर या… गुगल कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी आमिष

सॅमसंगच्या प्रिमियम स्मार्टफोनचे नवीन कलर व्हेरियंट… खरेदीवर मिळणार आकर्षक सूट

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.