Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियात खळबळ : हवामान खात्याचेही ट्विटर अकॉउंट हॅक

हॅकर्सनी हवामान खात्याचे ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावर एनएफटी (NFT) ट्रेडिंग सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. तो पिन केलेला संदेश दाखवत आहे, जो कोणत्याही एनएफटी ट्रेडिंगशी संबंधित आहे. संदेशात असे लिहिले आहे, “आम्ही BENZ अधिकृत कलेक्शनच्या प्रकटीकरणाच्या अनुषंगाने पुढील 2 तासांसाठी समुदायातील सर्व सक्रिय NFT व्यापार्‍यांसाठी एक एअरड्रॉप उघडला आहे.

सोशल मीडियात खळबळ : हवामान खात्याचेही ट्विटर अकॉउंट हॅक
ट्विटरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 12:12 AM

नवी दिल्ली : भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) ट्विटर हँडल हॅक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. शनिवारी संध्याकाळी अकाउंट हॅक झाल्याचा आरोप आहे. संबंधित अकाउंट रिस्टोर (Restore) करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या हॅकिंगमागे कोणाचा हात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र त्यांनीही या प्रकारामागे कोणाचा हात आहे, याबाबत कुठलेही भाष्य केलेले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तथा भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटर अकाउंट पाठोपाठ हवामान खात्याचे ट्विटर हॅक झाल्याने याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Indian Meteorological Departments Twitter handle hacked attempt to restore account)

प्रोफाइल फोटो देखील बदलला

‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार हॅकर्सनी हवामान खात्याचे ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावर एनएफटी (NFT) ट्रेडिंग सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे. तो पिन केलेला संदेश दाखवत आहे, जो कोणत्याही एनएफटी ट्रेडिंगशी संबंधित आहे. संदेशात असे लिहिले आहे, “आम्ही BENZ अधिकृत कलेक्शनच्या प्रकटीकरणाच्या अनुषंगाने पुढील 2 तासांसाठी समुदायातील सर्व सक्रिय NFT व्यापार्‍यांसाठी एक एअरड्रॉप उघडला आहे. सुरुवातीला अकॉउंटचा प्रोफाईल फोटो बदलला होता. मात्र, आता अकॉउंटच्या प्रोफाईलची जागा रिकामी दिसत आहे. हवामान खात्याने प्रयत्न करूनही अद्यापपर्यंत अकॉउंट पुन्हा सुरु होऊ शकलेले नाही.

अकॉउंट रिस्टोर (पुनर्संचयित) करण्याचा प्रयत्न सुरु

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, आमचे ट्विटर हँडल हॅक झाले आहे आणि आम्ही ते रिस्टोर (पुनर्संचयित) करण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण नागरिक काहिलीने त्रासले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचे अपडेट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरीक हवामान खात्याचे अर्थात IMD चे ट्विटर हँडलला भेट देत आहेत. याचदरम्यान हॅकर्सनी हवामान खात्याच्या ट्विटर अकॉउंटला टार्गेट केल्याची माहिती महापात्रा यांनी दिली आहे.

उष्णतेच्या लाटांचा लोक ट्विटरवरून घेतात अंदाज

देशभरातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आयएमडीच्या ट्विटर हँडलवरून सातत्याने ट्विट केले जात असून त्यात लोकांना सावधगिरीचा सल्ला दिला जात आहे. हॅकर्सनी ट्विटर अकॉउंट हॅक केले आहे. मात्र आतापर्यंत हॅकर्सनी त्यावरून कोणतेही आक्षेपार्ह ट्विट केलेले नाही. यावर लोकांना टॅग करीत ट्विट केले जात आहेत. त्यात एक मोशन ग्राफिक्सही पोस्ट करण्यात आले आहे, त्यासोबत Beanz ची वेबसाईटही देण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ यांचेही ट्विटर अकाउंट हॅक

याआधी शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, भाजप नेते योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले होते. सुमारे 40 लाख लोक या ट्विटर हँडलला फॉलो करतात. सुमारे 29 मिनिटे ते अकॉउंट हॅक करण्यात आले. यादरम्यान हॅकर्सनी अनेक ट्विट हटवले. यानंतर हे खाते काही काळासाठी निलंबित करण्यात आले होते. नंतर अकॉउंटवर कंट्रोल मिळवण्यात आला होता. (Indian Meteorological Departments Twitter handle hacked attempt to restore account)

इतर बातम्या

Tuljabhavani Temple : सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील 2 पुजाऱ्यांवर गुन्हा नोंद

Wardha : वर्ध्यात भरधाव वाहन पलटून दोन जण ठार, 19 जण जखमी; लग्नासाठी जात असताना घडला अपघात

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.