
आपल्यापैकी अनेकांसोबत असे झाले असेल की फोनवर बोलत असताना अचानक समोरील व्यक्तीचा आवाज बंद होतो आणि जेव्हा फोन पाहतो तेव्हा कळते की नेटवर्क गायब झालं आहे. ही समस्या सामान्य आहे आणि दररोज मोबाईल वापरकर्त्यांना याचा सामना करावा लागतो. तर आपल्या देशातील काही दुर्गम भाग असो वा प्रवास करताना ही समस्या आणखी गंभीर होते, ज्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे कॉल करता येत नाहीत आणि मेसेज पाठवता येत नाहीत. तर आजच्या लेखात आपण काही टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्हाला मोबाईल नेटवर्कच्या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकतात. चला जाणून घेऊयात.
लोकेशन शोधा
तुम्ही तुमच्या घरात, ऑफिसमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट जागेवर जाताच तुमचे मोबाईल नेटवर्क बंद पडते का? जर असे असेल तर, ही समस्या अनुभवणारे तुम्ही एकटे नाही आहात. बिल्डिंग बांधताना वापरण्यात आलेले काही गोष्टींमुळे कधीकधी नेटवर्क ब्लॉक होण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुम्हाला कॉल अटेंड करण्यासाठी तुमच्या घराच्या बाहेर किंवा ऑफिसच्या बाहेर यावे लागते.
फोन रीस्टार्ट करा
तुमच्या फोनमध्ये सतत नेटवर्कची समस्या सतावत असते तेव्हा आपण जवळच्या मोबाईल टॉवरचा शोध घेत फोन फिरवत असतो. अशा परिस्थितीत तुमचा फोन रीस्टार्ट करा. एकदा रीस्टार्ट झाल्यावर फोन आपोआप जवळच्या टॉवरशी कनेक्ट होईल.
तुमचा फोन अपडेट ठेवा
कधीकधी सॉफ्टवेअरमधील बिघाडांमुळे तुमचा फोन नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकत नाही. सुरुवातीच्या वेळेस आयफोन 17 सिरीजमध्येही असेच घडले होते , त्यानंतर ॲपलने ही समस्या सोडवण्यासाठी एक अपडेट जारी केला. म्हणून तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा.
बॅटरी चार्ज करणे
बॅटरी चार्ज होण्याचा थेट संबंध नेटवर्कशी होत असतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. खरं तर जेव्हा बॅटरी कमी असते तेव्हा फोनची सिस्टम सिग्नल अँटेनासह विविध घटकांना जाणारी पॉवर कमी करते. परिणामी फोनचा अँटेना सिग्नल योग्यरित्या शोधू शकत नाही. तर हे टाळण्यासाठी तुमच्या फोनची बॅटरी चार्ज ठेवा.