AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी थांबलेल्या ठिकाणी विराट कोहली आले अन्… एकनाथ शिंदे कोहलीच्या भेटीवर बोलले स्पष्ट, म्हणाले, आमच्या..

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडन दाैऱ्याहून राज्यात परतले आहेत. यावेळी लंडनमधील अनुभव सांगताना एकनाथ शिंदे दिसले. एकनाथ शिंदे यांनी हा सन्मान माझा नसून राज्यातील जनतेचा असल्याचे म्हटले. यासोबतच विराट कोहलीच्या भेटीवरही बोलताना ते दिसले.

मी थांबलेल्या ठिकाणी विराट कोहली आले अन्... एकनाथ शिंदे कोहलीच्या भेटीवर बोलले स्पष्ट, म्हणाले, आमच्या..
Eknath Shinde and Virat Kohli
| Updated on: Sep 13, 2026 | 7:57 AM
Share

लंडनवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतले आहेत. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अनेक लाडके भाऊ त्या ठिकाणी भेटले मराठी उद्योजक इंडस्ट्रियल इस्टेटचे मालक त्या ठिकाणी भेटले. अनेक लोक त्यांनी मला कार्यक्रमात भेटून सांगितलं की, त्या ठिकाणी ते स्थायिक झालेले आहेत. त्या ठिकाणी ते इतरांना रोजगार देतात आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. हा फक्त माझा सन्मान नाहीये, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा हा गौरव आहे. कॉमनवेल्थ पब्लिक अवॉर्ड, स्टेटमेंट शिप अवॉर्ड, महाराष्ट्र ग्लोबल प्राइड अवॉर्ड हे सगळे पुरस्कार मी महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित केलेले आहे हा सगळा त्यांचा गौरव आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्या वास्तूमध्ये महाराष्ट्राची बाजू ठेवण्याचं काम महाराष्ट्राचं विकास ब्रँडिंग करण्याचं काम त्या ठिकाणी मला मिळाले.

पुढे एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला पुढे नेले आहे. त्यांनी अर्थव्यवस्था वाढली, मजबूत होत आहे, महाराष्ट्र पुढे जात आहे. महाराष्ट्र आणि अन्य देशाचे संबंध जास्त पुढे जात आहेत. त्यामुळे तिथे लोकांना मी महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा अपील त्याठिकाणी केलेला आहे. मला खूप समाधान वाटले की, लोक मला तिथे भेटत होते.

जगाचा कानाकोपऱ्यात मराठी माणसं राहतात हे मला पाहायला मिळाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तूला देखील मी त्या ठिकाणी भेट दिली. लंडनमधील आर्किटेक्चर, सुव्यवस्था, शिस्त, ट्राफिकची व्यवस्था हे सर्व अनुभवाला पाहायला मिळालं. अनेक मराठी लाडक्या बहिणी लाडके भाऊ भेटायला आले. महाराष्ट्राच्या वतीने माझा सन्मान केला.

विराट कोहली हे देखील लंडनमध्ये होते. मी थांबलेल्या ठिकाणी ते आले त्या ठिकाणी आमची सविस्तर चर्चा झाली झाली. खरोखरच आनंद झाला. महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला जगाच्या पाठीवर बघायला मिळाली. मला त्या संस्कृतीमध्ये वडापाव हा जगात कुठेही मिळतो हे मला पाहायला मिळालं. लंडनमध्ये मराठी, मराठी माणसं महाराष्ट्र गीत हे देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाले. टीका करणाऱ्यांवर मी आज काय बोलणार नाही, असेही शिंदेंनी म्हटले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार