उन्हाळ्यात तुमचा फोन जास्त गरम होतोय का? त्वरित आराम थंड करण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो

देशाच्या अनेक भागांमध्ये उन्हाळा अधिक तीव्रतेचा सामना करावा लागत आहे. अशातच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्मार्टफोन गरम होणे ही एक मोठी समस्या आहे, कारण उष्णतेमुळे फोन लवकर गरम होतो. याचा परिणाम बॅटरीचे आयुष्य आणि वेग या दोन्हींवर होतो. काही सोप्या टिप्स ही समस्या कमी करण्यास मदत करू शकतात. चला तर मग या टिप्सबद्दल जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात तुमचा फोन जास्त गरम होतोय का? त्वरित आराम थंड करण्यासाठी या सोप्या टिप्स करा फॉलो
Mobile
| Edited By: | Updated on: Apr 17, 2026 | 1:54 PM

उन्हाळा सुरू झाला की जसजशी उष्णता वाढते, तसतसे स्मार्टफोन जास्त गरम होतात आणि ही एक सामान्य समस्या आहे. फोन गरम झाला की त्याचा परिणाम हा बॅटरी आणि कार्यक्षमता या दोन्हींवर होतो. तुमचा स्मार्टफोन सतत जास्त गरम झाल्यामुळे फोन हळू काम करू शकतो. मात्र यावर तुम्ही काही सोप्या सवयी अंगीकारल्यास ही समस्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. फोनच्या योग्य वापरामुळे तुम्ही उन्हाळ्यातही सुरळीत वापरू शकता आणि लवकर खराब होणार देखील नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण या काही सोप्या टिप्स जाणून घेऊयात.

स्क्रीनची ब्राइटनेस कमी ठेवा

स्मार्टफोनची स्क्रीन सर्वात जास्त बॅटरी वापरते आणि फोन जास्त गरम होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. जेव्हा तुम्ही फोन वापरताना ब्राइटनेस जास्त वाढवतात,तेव्हा डिव्हाइस अधिक पावर वापरते, ज्यामुळे फोनमध्ये हिट वाढते. म्हणून उन्हाळ्यात स्क्रीनचा ब्राइटनेस आवश्यकतेनुसार कमी ठेवणे उत्तम. यामुळे केवळ फोन थंड राहत नाही, तर बॅटरीचे आयुष्यही वाढते. विशेषतः उन्हात घराबाहेर जाताना ब्राइटनेस खूप जास्त वाढवणे टाळावे, कारण यामुळे फोन जास्त गरम होऊ शकतो.

एअरप्लेन मोड वापरा

तुम्ही उन्हाळ्यात बाहेर गेल्यावर जेव्हा नेटवर्क सिग्नल कमकुवत असते तेव्हा स्मार्टफोन सतत सिग्नल शोधत राहतो. ज्यामुळे डिव्हाइसवर भार वाढतो आणि फोन गरम होते. अशावेळेस एअरप्लेन मोड वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. तो तात्पुरते सर्व नेटवर्क कनेक्शन बंद करतो आणि फोनला विश्रांती देतो. ही पद्धत विशेषतः मेट्रो, ट्रेन किंवा कमी नेटवर्क असलेल्या भागांमध्ये उपयुक्त आहे. काही वेळेसाठी एअरप्लेन मोड चालू ठेवल्याने फोनचे तापमान हळूहळू कमी होते.

ओव्हर चार्जिंग करणे टाळा

फोन पूर्ण चार्ज झाल्यावर जास्त वेळ चार्जरला लावून ठेवल्याने तो जास्त गरम होऊ शकतो. यामुळे बॅटरीवर दाब येतो आणि फोनचे आतील तापमान वाढते. ओव्हरचार्जिंगमुळे बॅटरीचे आयुष्यही कमी होऊ शकते. त्यामुळे फोन पूर्ण चार्ज झाल्यावर लगेच चार्जरवरून काढणे उत्तम. फोन 90% किंवा 95% पर्यंत चार्ज करणे ही देखील एक चांगली सवय आहे. चार्जिंगच्या योग्य सवयी लावल्याने तुमच्या फोनचे आरोग्य सुधारते आणि तो जास्त गरम होत नाही.

उन्हाळ्यात फोनचा कव्हर काढून वापरा

बरेच लोकं त्यांच्या फोनचे संरक्षण करण्यासाठी जाड रबर किंवा प्लास्टिकचे कव्हर वापरतात, परंतु फोनला लावलेल्या कव्हर्समुळे उष्णता बाहेर पडण्यास अडथळा येतो. यामुळे फोनच्या आत उष्णता निर्माण होते. जी विशेषतः उन्हाळ्यात अधिक वाढते. जेव्हा तुम्ही घरात असता किंवा तुमचा फोन जास्त गरम होतो, तेव्हा तुम्ही थोड्या वेळासाठी फोनचे कव्हर काढून टाकावे. यामुळे फोन थंड होण्यास आणि उष्णता लवकर बाहेर टाकण्यास मदत होते.

उन्हात फोन वापरणे टाळा

उन्हाळ्यात थेट सूर्यप्रकाशात फोन वापरणे हे फोन जास्त गरम होण्याचे एक प्रमुख कारण आहे. सूर्यप्रकाशात स्क्रीन पाहण्यासाठी तुम्हाला ब्राइटनेस वाढवावा लागू शकतो, ज्यामुळे डिव्हाइसवर आणखी ताण येतो. याव्यतिरिक्त उन्हात गेम खेळल्याने किंवा जड ॲप्स वापरल्याने फोन जास्त गरम होऊ शकतो. म्हणून तुमचा फोन सावलीत किंवा थंड ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे केवळ तुमच्या फोनचे संरक्षण होणार नाही, तर दीर्घकाळात त्याची कार्यक्षमता देखील सुधारेल.

Follow Us