फोनवरुन कॉल हिस्ट्री काढायची, सायबर सेलची गरज नाही, कोणत्याही नंबरचे असे मिळवा कॉल डिटेल

how to find call history: देशातील दोन प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी कॉल हिस्ट्रीची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे तुम्ही स्वत:च कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री मिळवू शकतात. एअरटेल आणि जिओ या कंपन्यांनी सहा महिन्यांची कॉल हिस्ट्री त्यांच्या अ‍ॅप आणि वेबसाईटवरुन काढून देण्याची सुविधा दिली आहे.

फोनवरुन कॉल हिस्ट्री काढायची, सायबर सेलची गरज नाही, कोणत्याही नंबरचे असे मिळवा कॉल डिटेल
call history
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 11:13 AM

मोबाईल फोन प्रत्येकाची गरज बनली आहे. कधीतरी फोनची कॉल हिस्ट्री काढण्याची गरज पडते. फोनवरुन कॉल हिस्ट्री काढायची म्हणजे सायबर सेलकडे किंवा दूरसंचार कंपन्यांकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर त्यांना कारणे दिल्यावर एखाद्या नंबरची कॉल हिस्ट्री काढता येते. परंतु आता देशातील दोन प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे तुम्ही स्वत:च कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री मिळवू शकतात. एअरटेल आणि जिओ या कंपन्यांनी सहा महिन्यांची कॉल हिस्ट्री त्यांच्या अ‍ॅप आणि वेबसाईटवरुन काढून देण्याची सुविधा दिली आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री मिळवता येते. त्यामुळे युजरला आपल्या कॉलची माहिती मिळवता येते.

जिओने अशी दिली सुविधा

  • जिओ क्रमांकाची कॉल हिस्ट्री काढण्यासाठी MyJio अ‍ॅप वापरावा लागेल. या अ‍ॅपवरुन कॉल रेकॉर्ड सहजपणे मिळवू शकतात. त्यासाठी खालील स्टेपचा वापर करा.
  • मोबाईलवर Google Play Store डाऊनलोड करा आणि MyJio अ‍ॅप इंस्टॉल करा.
  • अ‍ॅपमध्ये लॉग इन करुन तुमचा जिओ नंबर लिंक करा.
  • ‘my statement’ सेक्शनमध्ये जाऊन अ‍ॅपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या तीन आडव्या रेषांवर क्लिक करा.
  • ‘my statement’ पर्यायामध्ये ज्या विशिष्ट तारखांचा तुम्हाला कॉल रेकॉर्ड हवा ती तारीख टाका.
  • ‘व्यू’ वर टॅप करा आणि तुमच्यासमोर कॉल रेकॉर्ड येईल.

एअरटेल युजरला वेबसाइट आणि अ‍ॅप या दोन्ही पर्यांयावरुन कॉल हिस्ट्री मिळता येते. तसेच एअरटेल ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क करून तुम्हाला कॉल हिस्ट्री मिळवता येते.

अशी मिळवा एअरटेल क्रमांकाची कॉल हिस्ट्री

  • एअरटेल https://www.airtel.in/ या वेबसाइटवर जाऊन लॉग इन करा.
  • वेबसाईटवर ‘वापराचा तपशील’ या सेक्सनमध्ये जा. त्यात कॉल रेकॉर्ड पाहण्याचा पर्याय निवडा.
  • कॉल रेकॉर्ड पाहण्यासाठी इच्छित तारीख श्रेणी निवडा अन् सबमिटवर क्लिक करा.
  • तुमचा कॉल रेकॉर्ड स्क्रीनवर दाखवला जाईल.

एअरटेलसाठी आणखी हा एक मार्ग

एअरटेलसाठी एसएमएसचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी तुमच्या मोबाईलमधील मॅसेज अ‍ॅप उघडा आणि त्यावर “121” टाका. त्यात “EPREBILL” करा. तसेच ज्या कालावधीचा हिस्ट्री हवी आहे त्याचाही उल्लेख करा आणि तुमचा ईमेल आयडी टाका. हा संदेश पाठल्यावर तुम्हाला मेलवर हिस्ट्री मिळेल.

एअरटेल थँक्स ॲप

  • एअरटेल कॉल तपशील मिळविण्यासाठी, एअरटेल थँक्स ॲप डाउनलोड करुन लॉग इन करा.
  • My Airtel या पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्री वर क्लिक करावे लागेल.
  • तुम्हाला एका नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल, जिथे सर्व व्यवहार आणि रिचार्ज माहिती दिसेल.
  • त्या ठिकाणी modify पर्यायावर क्लिक करा.
  • आता कॉल इतिहास तपासण्यासाठी विशिष्ट महिना निवडा. यानंतर तुम्हाला कॉल हिस्ट्रीचा तपशील पाहता येईल.

व्होडाफोन-आयडियाची कॉल डिटेल्स

  • ऑनलाइन व्होडाफोन-आयडियाची कॉल डिटेल्स काढण्यासाठी वेबसाइट Myvi.in वर जाऊन काढता येईल.
  • साइन -इन पर्याय आवश्यक माहिती भरा.
  • लॉगीन केल्यावर My Account पर क्लिक करा. त्यानंतर ‘Plan and Usages’ या पर्यायावर जा.
  • ‘Voice usage’ पर्याय निवडल्यानंतर तुम्ही मागील कॉल हिस्ट्री काढू शकतात.
Non Stop LIVE Update
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.