जिओच्या या पाच प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार

| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

मुंबई : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओने एण्ट्री मारल्यापासून इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झाले आहे. रिलायन्स जिओ प्रत्येक दिवसाला नवीन प्लॅन लाँच करत आहे. यामुळे इतर कंपनींनाही आपल्या प्लानमध्ये बदल करावा लागत आहे. कारण जिओ कमी पैशामध्ये यूजर्सला चांगले प्लॅन देत आह आणि प्रत्येक दिवशी नवीन यूजर्स जोडत आहे. रिलायन्स जिओकडे सध्या 149 ते 1699 रुपयांपर्यंतचे प्लॅन […]

जिओच्या या पाच प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार
Follow us on

मुंबई : टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये रिलायन्स जिओने एण्ट्री मारल्यापासून इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल झाले आहे. रिलायन्स जिओ प्रत्येक दिवसाला नवीन प्लॅन लाँच करत आहे. यामुळे इतर कंपनींनाही आपल्या प्लानमध्ये बदल करावा लागत आहे. कारण जिओ कमी पैशामध्ये यूजर्सला चांगले प्लॅन देत आह आणि प्रत्येक दिवशी नवीन यूजर्स जोडत आहे.

रिलायन्स जिओकडे सध्या 149 ते 1699 रुपयांपर्यंतचे प्लॅन आहेत. जिओने आतापर्यंत ग्रहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नव-नवीन प्लॅन लाँच केले आहेत. जिओच्या प्लानमुळे इतर कंपनींसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

जिओच्या प्रत्येक प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा मिळत आहे.

जिओचा 149 रुपयाचा प्लॅन

यूजर्सला या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत आहे. 1.5 जीबी डेटा याशिवाय दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉल

349 रुपयाचा प्लॅन

या प्लानमध्ये 70 दिवसांची वैधता आणि दररोज 100 एसएमएस, अनलिमिटेड कॉल आणि 1.5 जीबी डेटा

399 रुपयाचा प्लॅन

84 दिवसांची वैधता आणि दररोज 100 एसएमएस, 1.5 जीबी डेटा. यासोबत अनलिमिटेड कॉल

449 रुपयाचा प्लॅन

यामध्ये 91 दिवसांची वैधता आहे. दररोज 1.5 जीबी डेटा, अनलिमिटेड लोकल/एसटीडी कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मोफत

1,699 रुपयाचा प्लॅन

365 दिवसांची वैधता आणि दररोज 100 एसएमएस, अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगसह 1.5 जीबी हायस्पीड डेटा