Jio : ओटीटी ते डेटा… जिओच्या नव्या प्लॅनची तुफान चर्चा, एकदा रिचार्ज केलं की… वाचा नेमके फायदे काय?
Jio Plan : जिओने आपल्या कोट्यवधी यूजर्ससाठी एका नवीन रिचार्ज प्लॅनची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना खास ऑफर देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रिलायन्स जिओ ही भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीने आपल्या कोट्यवधी यूजर्ससाठी एका नवीन रिचार्ज प्लॅनची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना खास ऑफर देण्यात आली आहे. 36 दिवसांसाठी असलेल्या या प्लॅनची किंमत 450 रुपये इतकी आहे. ज्या लोकांना एक महिन्यापेक्षा जास्त आणि 3 महिन्यांपेक्षा कमी व्हॅलिडिटी असणारा प्लॅन हवा आहे अशा ग्राहकांसाठी हा रिचार्ज प्लॅन फायदेशीर ठरणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जिओचा 450 रपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओच्या 450 रपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो, म्हणजेच 36 दिवसांसाठी एकूण 72 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये केवळ 2 जीबी हाय-स्पीड 4 जी डेटाच नव्हे तर जिओच्या ट्रू 5 जी प्रोग्राम अंतर्गत अमर्यादित 5 जी डेटा देखील दिला जातो. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 मोफत एसएमएस देखील मिळतात.
एआय क्लाउड स्टोरेज
या प्लॅनमध्ये यूजर्सना 50 जीबी मोफत क्लाउड स्टोरेज देणारे जिओएआयक्लाउडमध्ये मोफत प्रवेश मिळतो. हे स्टोरेज बॅकअप, फोटो आणि कागदपत्रांसाठी मोफत एन्ट्री देते. या प्लॅनचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे 18 वर्षांवरील वापरकर्त्यांना 18 महिन्यांचा मोफत गुगल जेमिनी प्रो प्लॅन देखील मिळतो. या हाय-एंड एआय सबस्क्रिप्शनची किंमत 35100 रुपये आहे. मात्र आगामी काळात हा गुगल जेमिनी प्रो प्लॅन सक्रिय ठेवण्यासाठी 39 रुपये किंवा त्याहून जास्त किमतीचा 5जी रिचार्ज करावा लागेल.
ओटीटी
जियोच्या 450 रुपयांच्या प्लॅनमध्ये फेस्टिव्ह ऑफरसह ओटीटी सबस्क्रिप्शन मिळतील. यात जिओ टीव्ही आणि 3 महिन्यांचे जिओ हॉटस्टार मोबाइल/टीव्ही सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. या प्लॅन अंतर्गत, मासिक वापरकर्त्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यांसाठी जिओस्टार बेनिफिट्स मिळविण्यासाठी त्यांचा सध्याचा प्लॅन एक्सपायर होण्याच्या ४८ तास आधी रिचार्ज करावे लागेल. या प्लॅनमध्ये जिओ होम सर्व्हिसेससह अनेक इतर फायदे देखील दिले जातात. यात नवीन होम ब्रॉडबँड कनेक्शनची दोन महिन्यांची मोफत टेस्टिंग सुविधा देखील दिली जाते.
