Jio Network : टेलिकॉम क्षेत्रात जिओची नवी क्रांती, 5G नेटवर्क आणि रोमिंगचं टेन्शन मिटणार; नव्या निर्णयाने लाखो लोकांचा फायदा!
Reliance Jio आणि T-Mobile यांनी जगातील पहिलं 5G Standalone रोमिंग कनेक्शन यशस्वी केल्याची घोषणा केली असून, यामुळे भारत आणि अमेरिकेदरम्यान 5G रोमिंगसाठी नवा मार्ग खुला झाला आहे.

परदेशात गेल्यावर मोबाईल नेटवर्क स्पीड कमी होण्याची कटकट आता कायमची संपणार आहे. Relaince Jio आणि अमेरिकेतली T – Mobile यांनी जगातील पहिल्या 5G रोमिंग कनेक्शनचा टप्पा गाठला आहे. या सुविधेमुळे भारतातील Jio ग्राहक अमेरिकेत गेल्यावर T – Mobile च्या .. SA नेटवर्कचा वापर करू शकतील, तर अमेरिकेतली T – Mobile ग्राहक भारतात आल्यानंतर Jio च्या
5G SA नेटवर्कवर होऊ शकतील.
5G SA रोमिंग म्हणजे काय
सध्या अनेक 5G नेटवर्क्समध्ये 5G रेडिओसोबत 4G कोअर नेटवर्कचा वापर केला जात होता.याला 5G Non – Standalone म्हटलं जातं. मात्र 5G Standalone मध्ये पूर्णपणे स्वतंत्र आर्किटेक्चर आणि 5G कोअर नेटवर्कचा वापर केला जातो. त्यामुळे कमी विलंबाचा म्हणजेच लो लेटन्सीचा आणि अधिक स्थिर कनेक्टव्हिटिचा फायदा मिळू शकतो.
Jio यूजर्सना अमेरिकेत मिळणार फायदा
Jio ग्राहक अमेरिकेत प्रवास करत असताना T- Mobile च्या 5G SA कमी लेटन्सी आणि अधिक विश्वासार्हता कनेक्शनचा फायदा मिळण्याची शक्याता आहे. विशेषत:व्हिडिओ स्ट्रिमिंग, रिअल -टाईम कम्युनिकेशन, ऑनलाईन अॅप्स आणि इतर हाय- बँडविथ सेवांसाठी याचा फायदा होऊ शकतो.
अमेरिकन यूजर्सनाही भारतात 5G SA
या भागीदारीचा फायदा फक्त भारतीय ग्राहकांनाच होणार नाही तर T – Mobile चे ग्राहक भारतात प्रवास करताना Jio च्या 5G SA नेटवर्कवर रोमिंग करू शकतील. म्हणजे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी 5G कनेक्टिव्हिटी अधिक सहज करण्याचा प्रयत्न या तंत्रज्ञानातून केला जात आहे.
Syniverse च्या कनेक्टिव्हिटीमुळे झालं शक्य
Jio आणि T- Mobile यांच्यातील हे 5G SA रोमिंग कनेक्शन
Syniverse च्या कनेक्टिव्हिटीमुळे शक्य झालं आहे. या प्लॅटफॉर्ममुळे दोन्ही नेटवर्कमुळे दोन्ही नेटवर्क्स सुरक्षित आणि सुरळित होण्यास मदत होणार आहे. कंपन्यांच्या म्हणण्यांनुसार या तंत्रज्ञानामुळे भविष्यात आंतरराष्ट्रिय 5G रोमिंगचा विस्तार होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
म्हणजेच, भारतातून अमेरिकेत किंवा अमेरिकेतून भारतात सहज करताना 5G कनेक्टिव्हिचा अनुभव अधिक सहज करण्याच्या दिशेने Jio आणि T- Mobile ने अनुभव, उपलब्धता आणि व्यावसायिक अंमलबजावणी कशी असेल हे लवकरच स्पष्ट होईल.