दररोज 1.5 जीबी डेटा आणि 84 दिवसांची वैधता, जाणून घ्या कोणाचा प्लॅन आहे सर्वात स्वस्त
जिओचा प्लॅन आणि एअरटेलच्या थोड्याफार सारख्याच किंमती असलेल्या प्लॅनची तुलना करून सांगणार आहोत जेणेकरून रिचार्ज करण्यापूर्वी यापैकी कोणता प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल ते समजेल. चला तर मग आजच्या लेखात याबद्दल जाणून घेऊयात.

तुमच्याकडे जर रिलायन्स जिओ किंवा एअरटेलचे प्रीपेड सिम असेल तर पुढच्या वेळी रिचार्ज करण्यापूर्वी कोणती कंपनी दररोज 1.5 जीबी हाय-स्पीड डेटासह कमी किमतीचा प्लॅन देते हे तुम्हाला माहित असले पाहिजे. यासाठी आजच्या लेखात दोन्ही कंपन्यांच्या प्लॅन्सची तुलना करणार आहोत. यामध्ये जिओ प्लॅनची किंमत 799 आहे तर एअरटेल प्लॅनची किंमत 859 आहे. तर या दोन्ही कंपनीच्या प्लॅन्सची वैधता 84 दिवसांची आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणता प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल ते जाणून घेऊयात.
जिओ 799 प्लॅनची माहिती
रिलायन्स जिओच्या 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. 84 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये गुगल जेमिनी प्रो, 5000 जीबी क्लाउड स्टोरेज आणि 35,100 रुपये किमतीचे नॅनो बनाना यांसारखे फायदेही मिळतात. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउड स्टोरेजचा मोफत ॲक्सेस यांसारखे काही अतिरिक्त फायदेही मिळतात.
एअरटेल 859 प्लॅनची माहिती
एअरटेलच्या 859 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या 84 दिवसांच्या प्लॅनमध्ये 12 महिन्यांच्या वैधतेसह ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम, स्पॅम कॉल आणि एसएमएस अलर्ट, दररोज एकदा मोफत हॅलोट्यून आणि रिवॉर्ड्स मिनी सबस्क्रिप्शन यांसारखे अतिरिक्त फायदे मिळतात.
फरक: दोन्ही प्लॅन्समध्ये सारखाच डेटा आणि वैधता आहे. पण किमतीत 60 रूपयांचा फरक आहे. हा फरक अतिरिक्त लाभांमुळे आहे. दोन्ही प्लॅन्समध्ये काही अतिरिक्त लाभ मिळतात आणि प्रत्येक प्लॅनमध्ये वेगवेगळे लाभ आहेत. आता रिचार्ज करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की तुम्हाला गूगल जेमिनी प्रो हवा आहे की ॲडोबीचे प्रीमियम सबस्क्रिप्शन? त्यानुसार प्लॅन रिचार्ज करा.