Jio, Airtel, Vi : 365 दिवसांची वैधता अन् वर्षभराचा अनलिमिटेड डेटा; Jio, Airtel की Vi कोणाचा प्लॅन आहे सर्वात बेस्ट
वर्षभरासाठी रिचार्ज करून वारंवार रिचार्ज करण्याची कटकट कमी करा. Jio, Airtel आणि Vi कडून 365 दिवसांच्या वैधतेचे वार्षिक प्रीपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. फक्त इतक्याशा रिचार्जमध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि OTT फायदे मिळतात.

Jio vs Airtel vs Vi या तिन्ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी भरगोस प्रीपेड प्लॅन लाँच करत असतात. त्यापैकीच एका कंपनीने एक असा रिचार्ज प्लॅन लाँच केलाय ज्यामुळे तुम्हाला सारखा रिचार्ज मारण्याची गरजच लागणार नाही. याशिवाय तुम्हाला काही महिन्यांचा रिचार्ज फ्रिमध्ये मिळणार आहे. जाणून या पॅक बद्दल सविस्तर
Airtel 3999 रुपयांचा प्लॅन : Airtel चा हा 3999 रूपयांचा प्लॅन संपूर्ण वर्षाची वैधता देतोय. ज्यामुळे सारखा सारखा रिचार्ज करण्याची झंझट कमी होईल. याशिवाय तुम्हाला या पॅकमुळे वर्षभर अनलिमिटेड कॉल्स आणि मेसेजेस करता येणार आहेत.
Airtel चा 3999 प्लॅनचे फायदे : Airtel च्या या ३९९९ च्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना नेहमीचा 2.5GB चा डेटा मिळतो . याचसोबत एक्स्ट्रा 150GB डेटा देखील तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता. अनलिमिटेड कॉलिंग, अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. त्यामुळे जितका हवा तेवढा डेटा तुम्ही आरामात वापरू शकता. याचसोबत हॅलोट्युन्स, अॅडोब अक्सेस प्रिमियम ( १२ महिने ) यांसारखे बरेच फायदे तुम्हाला या Airtel च्या 3999 च्या रिचार्जने वर्षभर मिळू शकतात.
jio चा 3999 रूपयांचा प्लॅन : jio आपल्या ग्राहकांसाठी 3999 च्या रिचार्जमध्ये 2.5GB डेटा ऑफर करतो आहे. यामध्ये 5G ग्राहकांसाठी अनलिमिटेड डेटाचा देखील पर्याय देण्यात आला आहे.
jio रिचार्ज बेनिफिट्स : जर तुमच्या आजूबाजूला 5G नेटवर्क लाईव्ह असेल. तुमच्याकडे 5G फोन असेल तर तुम्हाला हवा तितका डेटा तुम्ही वापरू शकता. या प्लॅनमध्ये 5G यूजर्सना अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. तसेच जिओ टिव्ही, AI CLOUD, FANCODE सबस्क्रिप्शन तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळणार आहे. तसेच Jio hotstar चे सबस्क्रिप्शन 12 महिन्यांसाठी मिळते. तसेच canva lite आणि geimini चा देखील फायदा मिळतो.
vi चा 3999 चा रिचार्ज प्लॅन : vi आपल्या 3999 रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 2GB डेटा ऑफर करतो. हि कंपनी सुद्धा 5G यूजर्सना वर्षभरासाठी अनलिमिटेड डेटा वापरण्याची सुविधा देते.
AMEZON LITE चे सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी : Vi च्या या रिचार्जमध्ये वर्षभरासाठी Amezon prime lite चे वर्षभराचे सबस्क्रिप्शन मिळते. तसेच jio hotstar चे देखील सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय रोमिंग, हाफ डे अनलिमिटेड डेटा,वीकेंड डेटा रोलओवर आणि डेटा डिलाईट सारखे फायदे उपलब्ध आहे.