AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर होणार? नवे मुख्य सचिव मिळणार? कोणाच्या नावांची होतेय चर्चा?

राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर होणार असल्याची चर्चा आहे. राज्याला नवे मुख्य सचिव मिळणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. या पदासाठी तीन नावांची चर्चा होत आहे.

राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर होणार? नवे मुख्य सचिव मिळणार? कोणाच्या नावांची होतेय चर्चा?
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 7:56 AM
Share

राज्याच्या प्रशासनात मोठा उलटफेर होण्याची चर्चा आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी नवीन चेहरा दिला जाईल की आधीच्या मुख्य सचिवांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल, याची उत्सुकता प्रशासकीय वर्तुळात आहे. सध्या राज्याच्या मुख्य सचिवपदावर राजेश अग्रवाल आहेत.  अग्रवाल यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवलेला नाही. त्यात अग्रवाल हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहे.  त्यामुळे आता या पदासाठी मनीषा म्हैसकर, संजय सेठी आणि मिलिंद म्हैसकर यांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष प्रशासनाच्या घडामोडींकडे लागलं आहे.

एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार,  राजेश अग्रवाल हे मुख्य सचिवपदावरून 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होताहेत. त्यांना मुख्य सचिव पदासाठी 11 महिन्यांचा कार्यकाळ मिळालाय. खरंतर राज्यात दुष्काळाच्या काळात मुख्य सचिवांना मुदतवाढ दिल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे याच निकषानुसार अग्रवाल यांना मुदतवाढ मिळणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या दुष्काळाची दाहकता आणखी किती महिने राहील, याची शाश्वती कोणाला सांगता येत नाहीए. त्यामुळे केवळ मुख्य सचिवांना फक्त 3 महिन्यांची मुदत मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे. दुसरीकडे राज्य सरकारने देखील मुदतवाढीसाठी केंद्राकडे कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही.

आता कोण कधी होणार निवृत्त?

मुख्य सचिव पदासाठी तिघांची नावे चर्चेत आहेत. संजय सेठी देखील पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात  निवृत्त होत आहे. तर मिलिंदर म्हैसकर हे नोव्हेंबर 2028 रोजी निवृत्त होणार आहेत. तर मनीषा म्हैसकर मार्च 2029 मध्ये निवृत्त होणार आहेत. तिघे अधिकारी हे 1992 सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. ज्येष्ठतेचा विचार केल्यानंतर मनीषा म्हैसकर यांचं नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. मनीषा म्हैसकर सध्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. तर संजय सेठी यांच्यावर परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी आहे. तर मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी आहे.

मनीषा म्हैसकर यांना संधी दिल्यास त्यांना मुख्य सचिव पदाचा दोन वर्षे चार महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. तर संजय सेठी यांना पद दिलं तर त्यांना मुख्यसचिव पदाचा 10 महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. त्याचबरोबर मिलिंद म्हैसकर यांना संधी दिली तर त्यांना 14 महिन्यांचा कार्यकाळ मिळू शकतो. मिलिंद म्हैसकर यांच्यानंतर मनीषा यांना संधी दिली तर त्यांना फक्त 4 महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. त्यामुळे चार महिन्यांसाठी मुख्य सचिव करणे ही प्रशासनात अन्यायाची भावना मानली जाते. त्यामुळे आता मुख्य सचिवपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Follow Us
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर