Kavya Maran: SRH ची मालकीण काव्या मारन हिच्या लग्नात कर्मचाऱ्यांना लॉटरी! मिळाले हे महागडं गिफ्ट…
SRH Kavya Maran Wedding Gift to Employees: सनरायझर्स हैद्राबादची सहमालकीण आणि सनग्रुपच्या प्रमुखांपैकी एक काव्या मारन हिच्या लग्नात कर्मचाऱ्यांना महागडं रिटर्न गिफ्ट मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावर याविषयीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

SRH Kavya Maran Wedding Gift to Employees: IPL मधील संघ सनरायझर्स हैदराबाद(SRH) आणि स ग्रूपच्या प्रमुखांपैकी एक काव्या मारन हिच्या लग्नसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांच्यासोबत ती विवाहबंधनात अडकली आहे. तर काव्याच्या लग्नात कर्मचाऱ्यांना लॉटरी लागल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानुसार, काव्या मारन हिच्या लग्नात कर्मचाऱ्यांना सोन्याची अंगठी गिफ्ट मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण
सोशल मीडियावर या विषयीचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल आहे. त्यानुसार काव्या मारन हिच्या लग्नात कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सोन्याच्या अंगठ्या देण्यात आल्या आहेत. पण या दाव्याबाबत कंपनीने अथवा मारन कुटुंबाने कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. कर्मचाऱ्यांना सोन्याच्या अंगठ्या दिल्याबाबत कोणतेही सार्वजनिक निवेदन प्रसिद्ध केलेले नाही. केवळ सोशल मीडियातच हा दावा करण्यात येत आहे. पण त्यामुळे अनेकांनी काव्या मारन आणि कुटुंबियांचे कौतुक केले आहे.
ग्रीसमध्ये लग्न, चेन्नईत रिसेप्शन
११ नोव्हेंबर रोजी काव्या मारन आणि संगितकार अनिरुद्ध रविचंदर ग्रीसमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात विवाहबद्ध झाले. या सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रमंडळी हजर होते. लग्नानंतर या नवदाम्पत्याने चाहत्यांचे सोशल मीडियावर आभार मानले. ग्रीसमधील विवाहानंतर नवविवाहित जोडपे भारतात परतले. चेन्नई विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आज २१ नोव्हेंबर रोजी चेन्नईत एक भव्य रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे काही वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.
🔴 KAVYA MARAN GIVES A BIG GIFT TO SUN GROUP EMPLOYEES 🤯
– On the occasion of her wedding, Kavya Maran gifted a gold ring to every Sun Group employee. 😍 https://t.co/0lPXw8X8ai
— Sam (@cricsam02) November 20, 2026
काव्या मारन यांची क्रेझ
काव्या मारन या सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांच्या कन्या आहेत. इंडियन प्रीमियर लीगची फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह मालकीण आहेत. आयपीएलच्या सामन्या दरम्यान आपल्या संघाला प्रोत्साहन देताना आणि आनंद साजरा करतानाचे त्यांचे व्हिडिओ, रील्स तुफान व्हायरल झाले आहेत. काव्या मारन यांची क्रेझ तरुणाईत दिसून आली. आता लग्नानंतर त्या पुन्हा इंटरनेटवर ट्रेंड करता आहेत. तर कर्मचाऱ्यांना या लग्नानंतर सोन्याची अंगठी मिळाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
