AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan : अचानक फोन आला अन् सलमान म्हणाला ‘I am Sorry’… श्रद्धा कपूरची कशी झाली अवस्था?

Salman Khan And Shraddha Kapoor: अभिनेता सलमान खान याच्यावर अशी वेळ का आली, ज्यामुळे भाईजानला अभिनेत्री श्रद्धा कपूर हिची माफी मागावी लागली. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात सलमान खान याने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र भाईजानच्या माफीची चर्चा रंगली आहे.

Salman Khan : अचानक फोन आला अन् सलमान म्हणाला 'I am Sorry'... श्रद्धा कपूरची कशी झाली अवस्था?
सलमान खान - श्रद्धा कपूर
| Updated on: Nov 21, 2026 | 8:02 AM
Share

Salman Khan And Shraddha Kapoor: अभिनेता सलमान खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या अभिनेता ‘मातृभूमी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा 4 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. तर 4 डिसेंबर रोजीच अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘ईठा’ सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ हे दोन सिनेमे एकाच दिवशी आमने – सामने येणार आहेत. जर अभिनेत्याला माहिती असतं की, श्रद्धाचा सिनेमा देखील प्रदर्शित होत आहे, तर ‘मातृभूमी’च्या प्रदर्शनाची घोषणाच केली नसती… असं देखील सलमान खान म्हणाला. यासाठी सलमान खान याने श्रद्धा कपूर हिची माफी देखील मागितली. यावेळी सलमान खान अनेक सिनेमाबद्दल सांगितलं आणि कोणत्यातरी सिनेमा ‘मातृभूमी’ क्लॅश झालीच असती.. असं देखील अभिनेता म्हणाला आहे .

सांगायचं झालं तर, 27 नोव्हेंबर रोजी ‘मातृभूमी’ सिनेमा प्रदर्शित होणार होता, पण त्याच दिवशी सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘ये प्रेम मोल लिया’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. म्हणून ‘ये प्रेम मोल लिया’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच ‘मातृभूमी’ सिनेमा प्रदर्शित होऊच शकत नाही.. असं खुद्द सलमान खान म्हणाला.

‘शाहरुख – सुहानाच्या’ सोबत क्लॅश होऊच शकत नाही..

सलमान खान याने पु्ढे असं देखील म्हटलं आहे की, 24 तारखेला अभिनेता शाहरुख खान आणि सुहाना खान स्टारर ‘किंग’ सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्यामुळे त्या दिवशी मी माझा सिनेमा प्रदर्शित करू शकत नाही. ‘किंग’च्या एक आठवड्यापूर्वी ‘एवेंजर्स: डूम्सडे’ आणि ‘ड्यून पार्ट 3’ प्रदर्शित होत आहे. “सलमानने सांगितलं की, या दोन्ही सिनेमांशी त्याला काहीही घेणेदेणे नाही किंवा कोणतीही हरकत नाही; तो त्यांच्याशी कधीही क्लॅश करायला तयार आहे. मात्र, एका आठवड्यानंतर ‘किंग’ येत असल्यामुळे तो ‘डूम्सडे’च्या दरम्यानही आपला सिनेमा प्रदर्शित करू शकत नाही.”, यामुळे सलमान खान याने 4 डिसेंबर रोजी ‘मातृभूमी’ सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा केली.

सलमान खामच्या फोनवर श्रद्धा कपूर हिची प्रतिक्रिया…

‘ईठा’ आणि ‘मातृभूमी’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख एकच असल्याचं कळताच सलमान खान याला प्रचंड वाईट वाटलं. यावर सलमान खान म्हणाला, ‘मी श्रद्धाला माझ्या डोळ्यांसमोर मोठं होताना पाहिलं आहे. मी श्रद्धाला फोन केला आणि तिला सॉरी म्हणालो…’, यावर श्रद्धा कपूर म्हणाली, ‘काहीही हरकत नाही सर… दोन्ही सिनेमे प्रदर्शित होऊ शकतात इतका वेळ तर आहेच…’, एवढंच नाही तर, सलमान खान याने सर्व प्रेक्षकांना श्रद्धा कपूरचा सिनेमा पाहण्यासाठी आवाहन केलं आहे. आता कोणता सिनेमा रेकॉर्ड ब्रेक करेल, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...