JIO ने पुन्हा एकदा पुढाकार घेत मारली बाजी, VoNR नेटवर्क केले लाँच

रिलायन्स जिओने VoNR नेटवर्क डिप्लॉयमेंट केल्याची पुष्टी केली आहे. VoNR (Voice Over New Radio) हे कॉलिंग टेक्नॉलॉजी आहे. विशेष म्हणजे हे कॉलिंग फीचर्स देणारी रिलायन्स जिओ ही एकमेव टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल आणि व्हीआयकडून याबाबत कोणतेही अपडेट्स आलेले नाहीत.

JIO ने पुन्हा एकदा पुढाकार घेत मारली बाजी, VoNR नेटवर्क केले लाँच
Mukesh Ambani
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jan 20, 2025 | 12:54 AM

टेलिकॉम सेक्टरचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिओने पुन्हा एकदा त्यांच्या युजर्ससाठी खुश खबर आणली आहे.जिओचे मालक मुकेश अंबानी त्यांच्या युजर्ससाठी नेहमी नवं नवीन प्लॅन लाँच करत असतात. जेणेकरून टेलिकॉम कंपनांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व जास्त युजर्स मिळवण्यासाठी नवीन स्कीम मार्केटमध्ये आणत असतात. अशातच रिलायन्स जिओने VoNR नेटवर्क डिप्लॉयमेंट केल्याची पुष्टी केली आहे. VoNR (व्हॉईस ओव्हर न्यू रेडिओ) हे कॉलिंग टेक्नॉलॉजी आहे. विशेष म्हणजे हे कॉलिंग फीचर देणारी रिलायन्स जिओ ही एकमेव टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल आणि व्हीआयकडून याबाबत कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाही. जर तुम्हाला VoNR कॉलिंग सर्व्हिस वापरायची असेल तर तुम्हाला जिओचे युजर्स बनावे लागले.

कॉलिंगचा अनुभव आणखी छान होईल

आतापर्यंत जवळपास सर्वच टेलिकॉम कंपन्या कॉलिंग फीचर म्हणून VoLTE (Voice Over LTE) वापरतात. VoLTE हे कॉलिंग फीचर्स 4 जी नेटवर्कशी जोडलेले आहेत, तर VoNR हे नवीन टेक्नॉलॉजी 5 जी नेटवर्कशी जोडलेले आहे. अशावेळी तुमचा कॉलिंगचा अनुभव आणखी छान होईल. VoLTE च्या तुलनेत VoNR उत्कृष्ट व्हॉइस क्वालिटी प्रदान करते.

व्होडाफोन आयडिया

व्होडाफोन आयडियाबद्दल बोलायचे झाले तर एअरटेलप्रमाणेच 5G NSA (नॉन-स्टँडअलोन) लागू करण्याचा ही प्रयत्न आहे. यामुळेच व्होडाफोन आयडियादेखील त्याच्या ग्राहकांना VoNR सुविधा देऊ शकणार नाही. VoNR ही सुविधा आधीच दिल्ली आणि मुंबईतील ग्राहकांसाठी कार्यरत आहे. हे देशातील इतर राज्यांमध्ये आधीपासूनच अस्तित्वात असूही शकते.

जिओचे रिचार्ज प्लॅन

जिओच्या २९९ रुपयांच्या एअरटेल प्लॅनबरोबर कंपनी तुम्हाला दररोज १ जीबी हायस्पीड डेटा देते. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये स्पॅम अलर्ट आणि विनामूल्य हॅलो ट्यून्स देखील समाविष्ट केले आहेत. दरम्यान, इतर टेलिकॉम कंपनीच्या प्लॅन लक्षात घेता 249 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटासह जिओ २४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि SMS सोबतच जिओ क्लाऊड, जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा ॲक्सेस देखील मिळतो.