AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JioHotstar Plans: हा सर्वात स्वस्त OTT प्लॅटफॉर्म, दररोजचा खर्च फक्त ऐवढे रुपये

ओटीटीची क्रेझ वाढत आहे, आता रिलायन्स आणि हॉटस्टार या दोन मोठे प्लेयर्स एकत्र आले आहेत. रिलायन्स आणि हॉटस्टार एकत्र येत खळबळ माजवण्याच्या तयारीत असून त्याचा थेट फायदा तुम्हाला होणार आहे. कारण Jio Hotstar चे सबस्क्रिप्शन खूप कमी किमतीत विकले जात आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की मासिक आणि वार्षिक योजनांसाठी किती पैसे खर्च करावे लागतील?

JioHotstar Plans: हा सर्वात स्वस्त OTT प्लॅटफॉर्म, दररोजचा खर्च फक्त ऐवढे रुपये
| Edited By: | Updated on: Feb 15, 2025 | 7:09 PM
Share

दिवसेंदिवस ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढत चालेली आहे. कारण एखादी सिरीज म्हणा किंवा मूवी म्हणा यामधला कोणताही सीन कट न करता ग्लॅमरस, इंटीमेट सीन दाखवले जातात. त्यामुळे तरुणाईचा कल ओटीटीकडे जास्त प्रमाणत दिसून येतो. यासाठी दोन मोठे OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema आणि Disney Plus Hotstar आता एक झाले आहेत. JioHotstar हे एक आता वापरकर्त्यांना परवडणारे OTT प्लॅटफॉर्म बनले आहे. त्यामुळे Jio आणि Hotstarचे संयोजन इतर OTT प्लॅटफॉर्मवर मात करणार आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आता तुम्हाला Jio Hotstar चे मासिक सबस्क्रिप्शन अतिशय कमी दरात दिले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात प्लॅनच्या किंमती…

JioHotstar Plans Price: प्लॅनची किंमत किती आहे?

मोबाईल प्लॅन: तुम्हाला सुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिरीज मूवी बघायला आवडत असेल तर तुमच्यासाठी Jio Hotstar नवीन प्लॅन्स घेऊन आले आहेत ज्याची संपूर्ण माहिती ॲपवर देण्यात आली आहे, कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन मोबाईल यूजर्ससाठी आहे. एका डिव्हाइसवर काम करणारा प्लॅन तीन महिन्यांसाठी 149 रुपयांमध्ये ऑफर केला जात आहे, याचा अर्थ 50 रुपये प्रति महिना आणि 30 दिवसांसाठी 1.66 रुपये दैनिक खर्च असेल. अशातच तुम्हाला 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह एक प्लॅन मिळेल.

लक्षात घ्या की या प्लॅनमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहताना मध्येच जाहिराती पाहाव्या लागतील. जर तुम्ही एका वर्षासाठी प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला 499 रुपये खर्च करावे लागतील.

सुपर टीव्ही प्लॅन: तुम्हाला जर तुमच्या टीव्ही मध्ये Jio Hotstar चा हा प्लॅन खरेदी करायचा असेल तर तीन महिन्यांसाठी 299 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. म्हणजेच हा प्लॅन बघायला गेला तर प्रत्येक महिन्याची किंमत 100 रुपये असेल. हा प्लॅन 1 वर्षासाठी 899 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, म्हणजेच एका महिन्याची किंमत 75 रुपये असेल. या प्लॅन्ससह तुम्ही 2 उपकरणांवर (टीव्ही, मोबाइल किंवा लॅपटॉप) 1080 पिक्सेल रिझोल्यूशन कंटेंट पाहता येणार आहे.

JioHotstar Premium च्या तीन महिन्यांच्या प्लॅनची ​​किंमत 499 रुपये आहे, जर तुम्ही हा प्लॅन एका वर्षासाठी विकत घेतला तर तुम्हाला 1499 रुपये खर्च करावे लागतील, म्हणजेच प्रत्येक महिन्याला 125 रुपये खर्च येईल. ही योजना 4 उपकरणांना म्हणजेच टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल तसेच यात तुम्हाला कोणतीही जाहिरातीपाहाव्या लागफणार नाही, त्याचबरोबर डॉल्बी व्हिजनला आणि 4K रिझोल्यूशनसह कंटेंट पाहता येणार आहे.

Netflix Plans Price

जर तुम्हाला नेटफ्लिक्सच्या सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल सांगायचे झाले तर त्यांचा सर्वात स्वस्त मासिक प्लॅन 149 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, 30 दिवसांनुसार तुम्हाला या प्लॅनची ​​दैनिक किंमत 4.96 रुपये खर्च करावे लागतील . तसेच कंपनी या किंमतीत तुम्हाला मोबाईल प्लॅन देखील ऑफर करते.

JioCinema वापरकर्त्यांचे काय होईल?

जर तुमच्या मनात हा प्रश्न फिरत असेल की Jio Cinema वापरत असलेल्या वापरकर्त्यांचे काय होईल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की Jio Cinema वापरकर्त्यांना Jio Hotstar ॲपवर रीडायरेक्ट केले जाणार आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.