Lakshadweep Permit | असंच कसं जाता येईल भाऊ, लक्षद्वीपला! परवाना आहे का?

| Updated on: Jan 11, 2024 | 2:12 PM

Lakshadweep Permit | 'बॉयकॉट मॉरीशस' नंतर अनेक भारतीयांनी आता लक्षद्वीपला जाण्याची योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून काही वेळ घालवला. तेव्हा अनेक जण येथील निसर्गाच्या प्रेमात पडले. पण लक्षद्वीपमध्ये पाऊल ठेवणे वाटते तितके सोपे नाही...

Lakshadweep Permit | असंच कसं जाता येईल भाऊ, लक्षद्वीपला! परवाना आहे का?
Follow us on

नवी दिल्ली | 11 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या Lakshadweep दौऱ्यानंतर गुगलवर लक्षद्वीप सर्वाधिक ट्रेंड झाले. इतके ट्रेंड झाले की, मॉरिशसमधील अनेक मंत्र्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मॉरिशसमध्ये सर्वाधिक भारतीय सुट्या घालवण्यासाठी जातात. पण पंतप्रधानावरील टीकेनंतर Boycott Mauritius हा ट्रेंड व्हायरलच झाला नाही तर त्याचा दणका या चिमुकल्या राष्ट्राला बसला. गेल्या 20 वर्षांत कधीच सर्च झाले नव्हते इतके या काळात लक्षद्वीप सर्च झाले आहे. प्रत्येकाला इथे सुट्या घालवायच्या आहेत. पण ठरवलं आणि लक्षद्वीप गाठलं असं होत नाही. त्यासाठी अगोदर परवाना काढावा लागतो. परवानगी घ्यावी लागते. कशी आहे ही प्रक्रिया…

कसा करणार अर्ज

Lakshadweep Permit साठी कसा अर्ज करतात, हा प्रश्नच तुमच्या मनात लागलीच आला असेल, हो की नाही? तर त्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. मोठ्या शहरात तर अजिबात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करु शकता. या संकेतस्थळावर गेल्यावर तुम्हाला परमिटसाठी अर्ज करता येतो आणि सोप्या पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करता येते.

हे सुद्धा वाचा

Lakshadweep Permit साठी असे करा Apply

  1. सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवर जाऊन लक्षद्वीप सर्च करावे लागेल. त्यानंतर दुसऱ्या लिंकवर क्लिक करावे लागेल. ही सरकारी वेबसाईट आहे. इतर कोणती वेबसाईट तुम्ही निवडली तर नाही ना, हे तपासण्यासाठी वेबसाईटची लिंक तपासा. त्यात सर्वात शेवटी gov.in असे लिहिलेले असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात.
  2. गुगलवर दुसरी लिंक तुम्हाला ePermit Lakshadweep या नावाने लिहिलेली आढळेल. या लिंकवर क्लिक करा. संकेतस्थळाच्या होम पेजवर उजव्या बाजूला साईन-इन पर्याय मिळेल.
  3. साईन-इन पर्यायाच्या खाली Don’t have an Account, हा पर्याय दिसेल. या पर्यायावर टॅप करा. त्यानंतर योग्य माहिती भरा. ही माहिती भरल्यानंतर तुमचे खाते तयार होईल.
  4. एकदा खाते तयार झाल्यावर साईन-इन करा. आता परवान्यासाठी अर्ज करा. साईन-इन केल्यानंतर तुम्हाला आयलँड, बेटाचे नाव आणि प्रवासाची तारीख निवडावी लागेल. लक्षद्वीप हे एकूण 36 बेटांचे आहे. पण त्यातील सर्व नाही तर काहीच बेटांवर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. बेट निवडीनंतर तारीख निवडा. तुमची कागदपत्रे अपलोड करा.

किती लागेल खर्च?

लक्षद्वीप परमिटसाठी किती खर्च लागेल, अशा विचारात तुम्ही असाल तर हे शुल्क अगदी नाममात्र आहे. रिपोर्टसनुसार, प्रति अर्जदार अर्जासाठी 50 रुपये शुल्क अदा करावे लागेल. 12 ते 18 वयोगटासाठी 100 रुपये तर 18 वर्षांवरील व्यक्तीसाठी 200 रुपये जादा मोजावे लागतील.