48MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज आणि डुअल स्क्रीन असलेल्या ‘या’ स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट

| Updated on: Nov 07, 2020 | 2:20 PM

दिवाळीनिमित्त ई-कॉमर्स साईट्सवर विविध सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. अशात भारतात LG कंपनीचा बहुप्रतिक्षित LG Velvet Dual Screen हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.

48MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज आणि डुअल स्क्रीन असलेल्या या स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट
Follow us on

मुंबई : सणासुदीच्या मुहुर्तावर अनेक ई-कॉमर्स कंपन्या महागड्या स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट ऑफर्स देत आहेत. दिवाळीनिमित्त ई-कॉमर्स साईट्सवर विविध सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. अशात भारतात LG कंपनीचा बहुप्रतिक्षित LG Velvet Dual Screen हा स्मार्टफोन मागील आठवड्यात लाँच करण्यात आला. परंतु काही कारणास्तव तो विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला नव्हता.

आता ग्राहक हा फोन फ्लिपकार्टवरुन प्री-ऑर्डर करु शकतात. 12 नोव्हेंबरपासून या फोनची विक्री सुरु होईल, त्याचवेळी प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांपर्यंत फोन पोहोचवला जाईल. LG Velvet Dual Screen स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 SoC प्रोसेसर आहे.

फ्लिपकार्टने हा फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करुन दिला आहे. नवीन एलजी वेलवेट सिंगल स्क्रीन 36,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर डुअल स्क्रीन असलेल्या फोनची किंमत 49,990 रुपये आहे. हा फोन खरेदी करणाऱ्यांसाठी फ्लिपकार्टने अमेरिकन एक्सप्रेस कार्डवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. तसेच फेडरल बँकेच्या डेबिड कार्डवर आणि आरबीएल बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यास 5000 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट दिला आहे.

हा फोन अँड्रॉयड 10 वर चालतो. यामध्ये तुम्हाला 6.8 इंचांचा फुल्ल HD+ सिनेमा फुलव्हिजन POLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 SoC प्रोसेसरसह 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस (इंटर्नल मेमरी) देण्यात आली आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे या फोनची मेमरी 2 टीबीपर्यंत वाढवता येईल.

LG Velvet Dual Screen या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळेल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे. फोनमध्ये 4300mAh ची बॅटरी आहे, जी क्वालकॉम क्विक चार्ज 4+ ला सपोर्ट करते.

Xiaomi चा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोल्डेबल फोन लाँचिंगच्या मार्गावर

बजेट आणि मिड सेगमेंटमध्ये (किफायतशीर आणि मध्यम किंमतीतले फोन) लीड केल्यानंतर शाओमी (Xiaomi) लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन (Foldable Smartphone) लाँच करु शकते. शाओमीने यापूर्वी MI Mix Alpha या स्मार्टफोनचा खुलासा केला होता. हा फोन फ्लेक्सिबल OLED डिस्लेप्रमाणे होता. परंतु कंपनीने हा फोन लाँच केला नाही. आता कंपनी फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

XDA च्या रिपोर्टनुसार शाओमी कंपनी सध्या फोल्डेबल डिव्हाईसवर काम करत आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या डिव्हाईसचं नाव ‘Cetus’ असू शकतं. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, नवीन फोल्डेबल स्मार्टफोन MIUI च्या अँड्रायड 11 वर काम करेल. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या फोनचा कॅमेरा, या फोनमध्ये तब्बल 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रगॅन 800 सिरीजचा प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जो हाय एंड स्पेक्समध्ये गणला जातो. या फोन खूप महाग असणार आहे. कंपनीने पहिल्यांदाच फोल्डेबल फोनबाबत माहिती दिलेली नाही. यापूर्वीदेखील कंपनीने फोल्डेबल फोनचं डिझाईन लिक केलं होतं.

संबंधित बातम्या

Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

5G सपोर्टसह Oppo K7x स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(LG Velvet Dual Screen smartphone ready to pre order on flipkart with discounts)