मारुती सुझुकीचा मोठा निर्णय, लवकरच डिझेल कारचं उत्पादन थांबणार

| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने 1 एप्रिल 2020 पासून डिझेल कारचं उत्पादन थांबवणार असल्याचं जाहीर केलं. 1 एप्रिल 2020 पासून BS 6 एमिशन नियम लागू होणार आहेत. सध्याच्या डिझेल इंजिनला BS 6 नियमांनुसार अपग्रेड करण्यात कंपनीला खूप खर्च येणार आहे. कदाचित याच कारणामुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता […]

मारुती सुझुकीचा मोठा निर्णय, लवकरच डिझेल कारचं उत्पादन थांबणार
Follow us on

मुंबई : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने 1 एप्रिल 2020 पासून डिझेल कारचं उत्पादन थांबवणार असल्याचं जाहीर केलं. 1 एप्रिल 2020 पासून BS 6 एमिशन नियम लागू होणार आहेत. सध्याच्या डिझेल इंजिनला BS 6 नियमांनुसार अपग्रेड करण्यात कंपनीला खूप खर्च येणार आहे. कदाचित याच कारणामुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

“पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून कंपनी डिझेल गाड्यांचं उत्पादन थांबवणार आहे.  2022 पर्यंत कंपनीला कॉर्पोरेट एव्हरेज फ्यूल इफिशिएन्सी नॉर्मपर्यंत पोहोचता यावं, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. सीएनजी गाड्यांचा जास्त शेअर आम्हाला सरकारच्या नवीन नियमांचं पालन करण्यासाठी मदत करेल. या नव्या सरकारी पॉलिसीमुळे बाजारात सीएनजीची डिमांड वाढेल, अशी आम्हाला आशा आहे”, असे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे संचालक आरसी भार्गव यांनी सांगितलं.

या बातमीनंतर पुढच्या वर्षीपासून मारुती सुझुकीच्या कुठल्याही गाडीमध्ये डिझेल मॉडेल मिळणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. सध्या मारुती सुझुकीच्या अर्ध्या गाड्यांमध्ये डिझेलचं ऑप्शन दिलं जातं. यामध्ये बलेनो, अर्टिगा, स्विफ्ट आणि सियाज या गाड्यांचा समावेश आहे. नुकतचं लाँच करण्यात आलेल्या विटारा ब्रिझा या गाडीतही डिझेलचं ऑप्शन देण्यात आलं आहे.

सध्या मारुती सुझुकीचं डिझेल व्हर्जन एकूण विक्रिच्या 30 टक्के आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे कंपनीच्या एकूण विक्रिवरही मोठा परिणाम होऊ शकतो. एका रिपोर्टनुसार, मारुती सुझुकी भविष्यात 1.5 लिटरचं डिझेल इंजिन परत आणू शकते. कारण, या डिझेल इंजिनला डेव्हलप करण्यासाठी कंपनीने एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

BS6 नियमाचा कार कंपन्यांवर काय परिणाम होणार?

BS6 नियमांतर्गत पेट्रोल आणि डिझेल कारच्या किंमतीत फार अंतर येईल. हे अंतर अडीच लाखापर्यंत जाऊ शकतं. BS6 नियम लागू झाल्यानंतर डिझेल इंजिनला जास्त अपडेट करावे लागेल. या अपडेशनवर दीड लाखापर्यंत खर्च येईल. यामुळे पेट्रोल आणि डिझेल गाड्यांच्या व्हर्जनमधील अंतर हे एक लाखाहून अडीच लाखावर जाईल.

यापूर्वीही मारुती सुझुकी कंपनी ही त्यांच्या बलेनो, स्विफ्ट आणि डिझायरमधील डिझेल व्हेरिअंट बंद करणार असल्याचं वृत्त होतं. त्यावेळी आरसी भार्गव यांनी BS6 नियमांतर्गत पेट्रोल आणि डिझेल कारच्या किंमतीतील अंतर परवडण्यासारखे नाही, असं स्पष्ट केलं होतं. “जर तुमची गाडी रोज 70 किलोमीटर चालत असेल, तर 4-5 वर्षात डिझेल व्हर्जनसाठी 1 लाख रुपये खर्च करणे वसूल होते. पण, जर यासाठी 2-2.50 लाख देणं महागडं आहे. 10 वर्ष कार चालवल्यानंतरही ही किंमत वसूल होणार नाही. म्हणून मारुती कंपनी डिझेल कारमधील गुंतणूक थांबवण्याच्या विचारात आहे”, असं आरसी भार्गव यांनी सांगितलं होतं.