Narendra Modi Video: मोदींचा व्हिडिओ उडवल्याने राजधानीत खळबळ; थेट मेटाच्या ग्लोबल हेडला बोलावलं; काय घडतंय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ आता मेटाने फेसबुकवरुन चुकुन डिलीट केल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर मेटाने यासंदर्भातील आपली चूक मान्य केली आहे. पण आता यासंदर्भात मेटाचे ग्लोबल हेड यांना या प्रकरणात लक्ष घालावे लागणार असल्याचे दिसत आहे.

मगील दोन ते तीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सेल्फीमोड कॅमरा सेट करुन व्हिडिओ शूट केले होते. नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी असा व्हिडिओ शूट केला. Gen Z ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट करतात अगदी त्याच पद्धतीने मोदी यांनी व्हिडिओ शूट केला आणि तो अपलोड केला होता. मोदी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मोदी यांच्या व्हिडिओ खूप चर्चा ही झाली पण आता तोच एक व्हिडिओ मेटाने चुकून फेसबुकवरुन डिलीट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवर पोस्ट केलेला एक व्हिडिओ काढून टाकला होता. नंतर कंपनीने ही एक चूक असल्याचे सांगून तो व्हिडिओ पुन्हा पूर्ववत केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर लगेचच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटाच्या जागतिक सार्वजनिक धोरण प्रमुखांना (फेसबुक आणि इंस्टाग्राम) म्हणजे ग्लोबल हे़डला बोलावले होते.
मंगळवारी, मेटाने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ ब्लॉक करण्यासंदर्भात एक निवेदन जारी केले, ज्यात म्हटले आहे की “कंटेंट चुकून काढून टाकण्यात आला होता. व्हिडिओ आता पूर्ववत करण्यात आला आहे.” ANI च्या अहवालानुसार, मेटाने फेसबुकवरून पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ काढून टाकला. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, मेटाला ही बाब तात्काळ लक्षात आल्याने ती पटकन त्यांनी सुधरवली आणि पुन्हा तो पुवर्वत केला. पण आता MeitY (Ministry of Electronics and Information Technology) ने मेटाच्या ग्लोबल पब्लिक पॉलिसी हेडला समन्स पाठवले आहे. पूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
मेटाचे स्पष्टीकरण आणि प्रश्न
मेटाने आपली चूक मान्य करणारे अधिकृत निवेदन जारी केले, परंतु एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एवढी मोठी चूक कशी होऊ शकते, असा प्रश्न आता यूजर विचारत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, एआय-आधारित सामग्री फिल्टरिंग कधीकधी चुका करतात, विशेषतः उच्च-प्रतिष्ठित लोकांच्या अकाउंटसबाबत. भारतासारख्या देशात, जिथे राजकारण, निवडणुका आणि जनजागृतीसाठी सोशल मीडिया हे एक प्रमुख माध्यम आहे, तिथे प्लॅटफॉर्म्सनी अधिक सतर्क राहिले पाहिजे. या घटनेमुळे मेटा आणि इतर कंपन्यांनी भारत सरकारसोबत अधिक चांगला समन्वय साधण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.