Micromax IN Note 2 स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Jan 25, 2022 | 5:51 PM

मायक्रोमॅक्सचा (Micromax) बहुप्रतीक्षित मायक्रोमॅक्स इन नोट 2 (Micromax IN Note 2) अखेर भारतीय बाजारात लाँच झाला आहे. या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले, एक फास्ट-चार्जिंग बॅटरी आणि मागच्या बाजूला 4-कॅमेरा सेटअप आहे. ज्यामुळे IN Note 2 एक शानदार स्मार्टफोन बनतो.

Micromax IN Note 2 स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Micromax In Note 2 (PS- Twitter)
Follow us on

मुंबई : मायक्रोमॅक्सचा (Micromax) बहुप्रतीक्षित मायक्रोमॅक्स इन नोट 2 (Micromax IN Note 2) अखेर भारतीय बाजारात लाँच झाला आहे. या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले, एक फास्ट-चार्जिंग बॅटरी आणि मागच्या बाजूला 4-कॅमेरा सेटअप आहे. ज्यामुळे IN Note 2 एक शानदार स्मार्टफोन बनतो. IN Note 2 अशा वेळी बाजारात दाखल झाला आहे, जेव्हा बजेट सेगमेंटमध्ये आधीपासूनच Realme आणि Redmi सारखे ब्रँड पाय रोवून उभे आहेत. Realme ने नुकताच Realme 9i लाँच केला आहे. Xiaomi चा सबब्रँड Redmi येत्या काही दिवसांत Redmi Note 11S भारतात सादर करण्यासाठी सज्ज आहे. फोन लॉन्च होण्यापूर्वी मायक्रोमॅक्सने शेअर केलेल्या या नोट 2 चे स्पेसिफिकेशन्स सूचित करतात की हा चिनी कंपन्यांसाठी मजबूत प्रतिस्पर्धी असू शकतो.

या नोट 2 ची किंमत 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या एकमेव व्हेरिएंटसाठी 12,490 रुपये आहे. फोन काळ्या आणि तपकिरी रंगात सादर करण्यात आला आहे. त्याचा पहिला सेल फ्लिपकार्टवर 30 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. मायक्रोमॅक्सने सांगितले की 12,490 रुपयांची किंमत ही स्टॉक संपेपर्यंत ऑफरचा एक भाग असेल, याचा अर्थ भविष्यात किंमत वाढवली जाऊ शकते.

मायक्रोमॅक्स इन नोट 2 चे स्पेसिफिकेशन्स

मायक्रोमॅक्सचा IN ब्रँड हळूहळू नियर-स्टॉक एंड्रॉयड सॉफ्टवेयर ऑफर करणार्‍या काही ब्रँड्सपैकी एक बनत आहे आणि ही कंपनी नोकिया आणि मोटोरोलासाठी धोकादायक ठरू शकते. IN Note 2 च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशोसह 6.43 इंच फुल-HD + AMOLED डिस्प्लेसह येतो.

IN Note 2 मध्ये 4GB RAM आणि 64GB इंटर्नल स्टोरेजसह ऑक्टा-कोर MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन Android 11 सॉफ्टवेअरवर चालतो. मायक्रोमॅक्सने सांगितले आहे की, या फोनमध्ये किमान पुढील एक वर्ष सुरक्षा अपडेट्स मिळतील. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, जो फोनच्या उजव्या बाजूला असलेल्या फोनच्या पॉवर बटणावर आढळतो. या फोनमध्ये फेस अनलॉक फीचरदेखील आहे. IN Note 2 मध्ये 30W फास्ट चार्जिंगसह 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी फास्ट चार्जरच्या मदतीने 25 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल.

IN Note 2 च्या बॅक पॅनलवरील चार कॅमेऱ्यांमध्ये Samsung GM1 ISOCELL सेन्सरसह 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. कॅमेरा अॅपमध्ये तुम्हाला नाईट मोड आणि एआय मोड सारखे फीचर्स मिळतात. सेल्फीसाठी, फोनमध्ये डिस्प्लेच्या पंच-होलमध्ये 16 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि एफएम रेडिओ सपोर्टसह डेडीकेटेड मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे.

इतर बातम्या

1 GB इंटरनेटसाठी या देशांमधील नागरिक हजारो रुपये मोजतात, भारत-इस्रायलमध्ये डेटा सर्वात स्वस्त

GB/128GB, ट्रिपल रिअर कॅमेरा Realme चा नवीन फोन बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात

पेटीएम पेमेंट्स बँकेची विक्रमी कामगिरी, दर महिन्याला 92.6 कोटी यूपीआय ट्रान्झॅक्शन्सचा टप्पा पार

(Micromax IN Note 2 launched in India, know price and features)