1 GB इंटरनेटसाठी या देशांमधील नागरिक हजारो रुपये मोजतात, भारत-इस्रायलमध्ये डेटा सर्वात स्वस्त

भारतात डेटावरील खर्च खूपच कमी आहे. एरिक यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर सांगितले की, भारतात 1 जीबी डेटासाठी (cost of 1 GB data) फक्त 0.09 डॉलर (जवळपास 7 रुपये) शुल्क आकारले जाते, जो सर्वात कमी डेटा खर्च (lowest data cost) आहे.

1 GB इंटरनेटसाठी या देशांमधील नागरिक हजारो रुपये मोजतात, भारत-इस्रायलमध्ये डेटा सर्वात स्वस्त
Earth (Photo : Google Maps)
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 3:22 PM

मुंबई : प्रसिद्ध पर्यावरणवादी (एनवायरमेंटलिस्ट) एरिक सोल्हेम (Erik Solheim) यांनी शनिवारी भारत आणि इतर देशांच्या इंटरनेट डेटावरील खर्चाची तुलना करताना सांगितले की, भारतात डेटावरील खर्च खूपच कमी आहे. एरिक यांनी त्याच्या ट्विटर हँडलवर सांगितले की, भारतात 1 जीबी डेटासाठी (cost of 1 GB data) फक्त 0.09 डॉलर (जवळपास 7 रुपये) शुल्क आकारले जाते, जो सर्वात कमी डेटा खर्च (lowest data cost) आहे. याशिवाय, इस्रायलमध्ये 1 GB डेटासाठी 0.11 डॉलर आकारले जाते, जे 8.19 रुपयांच्या बरोबर आहे. त्याच वेळी, यूएस आणि कॅनडामध्ये 1 जीबी डेटाची किंमत अनुक्रमे 8 डॉलर (जवळपास 595 रुपये) आणि 12.55 डॉलर (जवळपास 933 रुपये) आहे.

एरिक सोल्हेम यांनी आपल्या ट्विटसह एक इमेज ग्राफ शेअर केला आहे ज्यामध्ये विविध देशांचा डेटा खर्च सांगितला आहे. इटलीमध्ये डेटाची किंमत 0.43 डॉलर प्रति जीबी आहे, म्हणजेच तेथील नागरिक 1 जीबी डेटासाठी 32 रुपये खर्च करतात. ग्रीसमध्ये 1 GB डेटासाठी 12.06 डॉलर (जवळपास 897 रुपये) आकारले जातात, तर दक्षिण कोरियामध्ये 10.94 डॉलर (जवळपास 814 रुपये) आकारले जातात.

एकंदरीत, जगभरात सेल फोनचा वापर वाढत आहे, तरीही डेटाची किंमत देशांनुसार मोठ्या प्रमाणात बदलते. सर्वात स्वस्त डेटा खर्च (भारत) आणि सर्वात महाग (मलावी) डेटाची किंमत यामध्ये 30,000% फरक आहे.

जगभरात 1 GB डेटाची सरासरी किंमत किती आहे ते जाणून घ्या…

सर्वात महाग मोबाइल डेटा असलेले टॉप 3 देश

  • मलावी – 27.41 डॉलर (जवळपास 2039 रुपये)
  • बेनिन – 27.22 डॉलर (जवळपास 2025 रुपये)
  • चाड – 23.33 डॉलर (जवळपास 1736 रुपये)

सर्वात स्वस्त मोबाइल डेटा असलेले टॉप 5 देश

  • भारत – 0.09 डॉलर (जवळपास 7 रुपये)
  • इस्रायल – 0.11 डॉलर (जवळपास 8 रुपये)
  • किर्गिझस्तान – $ 0.21 (जवळपास 15 रुपये)
  • इटली – 0.43 डॉलर (जवळपास 32 रुपये)
  • युक्रेन – 0.46 डॉलर (जवळपास 34 रुपये)

1 जीबी डेटासाठी बोत्सवानामधील नागरिकांना 13.87 डॉलर (जवळपास 1032 रुपये) मोजावे लागतात. तर येमेनमधील डेटा कॉस्ट 15.98 डॉलर (जवळपास 1189 रुपये) आणि बोलिव्हियामध्ये सरासरी डेटा खर्च 5 डॉलर (जवळपास 372 रुपये) आहे.

भारतात ब्रॉडबँड स्पीड वाढतोय

Ookla च्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सने जारी केलेल्या डेटानुसार, जून 2021 मध्ये भारत फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत जगभरात 70 व्या क्रमांकावर होता. Ookla चा स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स दर महिन्याला जगभरातील इंटरनेट स्पीड डेटाची तुलना करतो. जून 2021 मध्ये भारताने इंटरनेट स्पीडमध्ये वाढ नोंदवली आणि मोबाइल डाउनलोड स्पीडच्या बाबतीत देशाचा 122 वा आणि ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत 70 वा क्रमांक आहे.

इतर बातम्या

7000 रुपयांहून कमी किंमतीत एकापेक्षा एक उत्तम स्मार्टफोन, Nokia सह 4 कंपन्यांचे पर्याय

ट्रिपल रिअर कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 680 SoC प्रोसेसरसह Realme 9i भारतात लाँच, किंमत…

Motorola चा नवीन Tablet बाजारात, Realme Pad, Samsung Tablet ला टक्कर

(cost of 1GB data is lowest in india, How much does internet data cost in other countries)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.