दिवसभरात किती वेळ इन्स्टाग्राम रील्स, WhatsApp बघितलं? ‘हे’ अ‍ॅप सांगणार सगळी माहिती

दिवसभरात किती वेळा फोन लॉक आणि अनलॉक झाला, इंस्टाग्राम -व्हॉट्सॲपवर किती वेळ घालवला, हे सर्व फोनमधील एका सेटिंग वर कळेल. तुमची मोबाइल ॲक्टिव्हिटी आणि व्हॉट्सॲप-इंस्टाग्राम वापराची वेळ पाहण्यासाठी ही ट्रिक फॉलो करा.

दिवसभरात किती वेळ इन्स्टाग्राम रील्स, WhatsApp बघितलं? 'हे' अ‍ॅप सांगणार सगळी माहिती
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 2:01 PM

आजच्या घडीला प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहेच. त्यात आपण दिवसभर फोनचा वापर करत असतो. ज्यात व्हॉट्सॲप वरचे मेसेज कधी इंस्टाग्रामवरील रिल्स पाहत असतो. पण तुम्ही दिवसभरात किती वेळा तुमचा फोन लॉक करता आणि अनलॉक करता, तसेच व्हॉट्सॲप किंवा इंस्टाग्राम वरील रील्स बघण्यात किती वेळ घालवता. हे तुम्हाला सुद्धा माहित नसतं. याचा नेमका आकडा कोणालाच माहित नाही. तुम्ही दिवसभरात फोनवर किती वेळ घालवला याची कल्पना आली तर तुम्ही काय कराल? तुम्ही फोनसोबत नेमकी किती वेळ घालवला आहे. हे तुम्ही या ट्रिकने पाहू शकता. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही, फक्त तुमच्या फोनच्या सेटिंग्समधील या पर्यायावर जाऊन पाहू शकता. यानंतर तुम्ही तुमचा वेळ मॅनेज करू शकाल आणि गरजेनुसार फोनचा वापर कराल.

काय कराल

– यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त तुमच्या स्मार्टफोनमधील सेटिंग्ज ओपन करा, सेटिंग्स उघडल्यानंतर थोडे खाली स्क्रोल करा आणि डिजिटल वेलबीइंग आणि पॅरेंटल कंट्रोलवर क्लिक करा. यामध्ये तुम्ही किती वेळ फोन वापरला आहे हे तुम्हा समजेल.

– यानंतर थोडे खाली स्क्रोल करा, त्यानंतर तुम्हाला टाइम ओपनचा पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक करा. ॲक्टिव्हिटी ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तीन ऑप्शन ओपन दिसतील, त्यापैकी स्क्रीन टाइम, नोटिफिकेशन आणि फोन लॉक हे ऑपशन्स दिसतील, तुम्ही एक-एक करून सर्व काही तपासू शकता.

हे सुद्धा वाचा

– फोन लॉकवर क्लिक केल्यास दिवसभरात तुम्ही किती वेळा तुमचा फोन लॉक केला आहे याची माहिती मिळेल.

– याच्या अगदी खाली तुमच्या फोनचे बाकीचे ॲप्लिकेशन्सही दाखवले जातील, तुम्ही व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर किती वेळ घालवला आहे हे तुम्ही इथे तपासून पाहू शकता.

इंस्टाग्रामवर तुम्ही लाईक केलेल्या पोस्ट कशा पाहाव्यात?

– जर तुम्हीही सतत इंस्टाग्रामवरील रील पाहात असाल आणि पेज रिफ्रेश च्या वेळी ती रिल्स निघून जाते अश्या वेळेस तुम्ही ती रिल्स किंव्हा फोटो पुन्हा अशा प्रकारे पाहू शकता. यासाठी सर्वप्रथम आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर जा. वरच्या उजव्या साईट कॉर्नरमध्ये मेनू ओपन करा, त्यानंतर कुठेही जाऊ नका, फक्त ॲक्टिव्हिटीजच्या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला लाइक्सच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्ही पाहात असलेले फोटो आणि व्हिडीओवर क्लिक करा आणि बघा…

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.