58 तासांचा बॅटरी बॅकअप भारतीय बाजारात लाँच झाला मोटोचा ‘हा’ नवीन फोन

भारतीय बाजारात मोटोचा हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा फोन 24GB पर्यंत रॅम आणि 58 तासांपर्यंत बॅटरी लाइफसह येतो, तसेच अनेक प्रभावी फीचर्स देखील आहेत. चला जाणून घेऊया की या फोनमध्ये कोणते फीचर्स असतील आणि या हँडसेटवर तुम्हाला किती खर्च करावा लागेल.

58 तासांचा बॅटरी बॅकअप भारतीय बाजारात लाँच झाला मोटोचा हा नवीन फोन
Moto G67 Power 5G smartphone
Image Credit source: Motorola/X
| Edited By: | Updated on: Nov 06, 2025 | 4:03 PM

तुम्ही जर जुन्या फोनवरून नवीन फोनवर अपग्रेड करण्याचा विचार करत असाल परंतु तुमचे बजेट 20,000 रुपयांपर्यंत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. कारण मोटोरोला कंपनीने त्यांचा Moto G67 Power 5G हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. फिचर्सच्या बाबतीत या फोनमध्ये 58 तासांपर्यंत बॅटरी लाइफ, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i आहे. तर आजच्या लेखात जाणून घेऊया हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल आणि यात कोणते जबरदस्त फिचर्स आहेत.

Moto G67 Power 5G ची भारतातील किंमत

या नवीनतम मोटोरोला स्मार्टफोनच्या 8 जीबी/128 जीबी व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. याशिवाय या फोनचा एक टॉप-ऑफ-द-लाइन असलेला 8 जीबी/256 जीबी व्हेरिएंट देखील आहे, परंतु या व्हेरिएंटची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. हा व्हेरिएंट लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. इंटरोडक्टरी ऑफरचा भाग म्हणून बेस व्हेरिएंट 14,999 रुपये मध्ये उपलब्ध केला आहे.

मोटोच्या या फोनच्या उपलब्धतेच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा फोन 12 नोव्हेंबरपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या किंमतीच्या रेंजमध्ये, हा फोन Vivo T4x 5G, Oppo K13 5G, Infinix Note 50S Plus, iQOO Z10X 5G, Poco X7 5G आणि Realme P3 5G सारख्या ब्रँड फोनला टक्कर देणार आहे.

Moto G67 Power 5G स्पेसिफिकेशन्स

चिपसेट: या नवीनतम मोटोरोला मोबाईल फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7S जनरेशन 2 चिपसेट वापरण्यात आला आहे.

कॅमेरा: या फोनच्या पुढील आणि मागील कॅमेरे 4K रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहेत. मागील कॅमेऱ्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50MP Sony LYT 600 सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. सेल्फीसाठी 32MP फ्रंट सेन्सर देखील प्रदान केला आहे.

डिस्प्ले: या हँडसेटमध्ये फुल एचडी+ रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा डिस्प्ले आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7आय देखील स्क्रीन प्रोटेक्शनसाठी वापरण्यात आलेला आहे.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 7000 mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे, कंपनीचा दावा आहे की हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 58 तास चालतो.