Motorola Edge 30 Ultra 200 MP कॅमेऱ्यासह लॉन्च, दमदार फीचर्सने युजर्सना लागले वेड…

| Updated on: Sep 09, 2022 | 6:51 PM

Motorola Edge 30 Ultra स्मार्टफोन 200MP कॅमेरासह लॉन्च झाला आहे. केवळ 200 मेगापिक्सेल कॅमेराच नाही तर या फोनमध्ये इतरही दमदार फीचर्स आहेत. या लेखाच्या माध्यमातून त्याबाबत माहिती घेणार आहोत.

Motorola Edge 30 Ultra 200 MP कॅमेऱ्यासह लॉन्च, दमदार फीचर्सने युजर्सना लागले वेड…
Motorola Edge 30 Ultra 200 MP कॅमेरासह लॉन्च
Image Credit source: TV9
Follow us on

नुकताच मोटोरोला एडज्‌ 30 अल्ट्रा (Motorola Edge 30 Ultra) स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या फोनच्या महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा मोटोरोला स्मार्टफोन 200 मेगापिक्सेल कॅमेरा सेंसरसह लॉन्च करण्यात आला आहे. यासोबतच Motorola Edge 30 Ultra मध्ये Qualcomm ब्रँडचा फ्लॅगशिप प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये इतर अनेक अत्याधुनिक फीचर्सही (Features) देण्यात आले आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन अधिक प्रीमिअम (Premium) दिसतोय. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पुढील प्रमाणे :

डिस्प्ले : या मोटोरोला फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सेल) pOLED कर्व्ड डिस्प्ले आहे. फोन HDR10 Plus 1250 nits ची पीक ब्राइटनेस ऑफर करतो. सेफ्टीसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 वापरण्यात आला आहे.

Motorola Edge 30 Ultra स्मार्टफोन 200MP कॅमेरासह लॉन्च झाला आहे. केवळ 200 मेगापिक्सेल कॅमेराच नाही तर या फोनमध्ये इतरही दमदार फीचर्स आहेत. या लेखाच्या माध्यमातून त्याबाबत माहिती घेणार आहोत. फोनच्या मागील बाजूस 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 60 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरे क्वाड पिक्सेलचा वापर करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.2, 5G, GPS, A-GPS, Wi-Fi 6, USB टाइप-C पोर्ट, NFC आणि डिस्प्लेपोर्ट 1.4 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीसाठी फोनमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच ग्राहकांना या फोनमध्ये फेस अनलॉक आणि थिंकशिल्ड प्रोटेक्शन मिळेल. या फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉससह ड्युअल स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत.

बॅटरी : फोनला अधिक दमदार बनविण्यासाठी कंपनीकडून यात 4610 mAh बॅटरी देण्यात आली असून ती 125 W टर्बोपॉवर वायर्ड चार्जिंग आणि 50 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

काय असणार किंमत

Motorola Edge 30 Ultra Price या Motorola स्मार्टफोनची किंमत जवळपास 72,150 रुपये असण्याची शक्यता आहे. ही किंमत फोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. इंटरस्टेलर ब्लॅक आणि स्टारलाईट व्हाईट असे या फोनचे दोन कलर व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत.