Mukesh Ambani | मुकेश अंबानींना या व्यक्तीने दिली होती Jio ची आयडिया, 6 वर्षांनी संपूर्ण इंडस्ट्रीच बदलली

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Sep 09, 2022 | 4:03 PM

Mukesh Ambani | कोणत्याही वस्तू, उत्पादनाची जन्मकथा ही कोणत्या तरी कल्पनेतून होत असते. टेलिकॉम बाजारातील दिग्गज कंपनी Jio ची सुरुवात कशी झाली, त्याची ही रंजक कथा..

Mukesh Ambani | मुकेश अंबानींना या व्यक्तीने दिली होती Jio ची आयडिया, 6 वर्षांनी संपूर्ण इंडस्ट्रीच बदलली
जिओच्या जन्माची रंजक कथा
Image Credit source: सोशल मीडिया

Mukesh Ambani | रिलायन्स जिओला (Reliance Jio) टेलिकॉम मार्केटमध्ये धमाका करुन 6 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या कंपनीची जादू अजूनही बाजारावर कायम आहे. 5 सप्टेंबर 2016 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजने टेलिकॉम बाजारात (Telecom Market) पाऊल ठेवले होते. त्यानंतर भारताचं टेलिकॉम मार्केट पूर्णता बदलून गेले. जियो बाजारात येण्यापूर्वी केवळ कॉलिंग (Calling) सुविधेवर कंपन्या जोर देत होत्या. जिओमुळे कंपन्या डेटावर (Data) भर देत आहेत.

सोशल मीडिया वाढला

भारतात जिओ येण्यापूर्वीही सोशल मीडियाचा वापर होत होता. परंतु, जिओने बाजारात जोरदार धडक दिली. कॉलिंगऐवजी कंपनीने डेटा प्लॅनवर लक्ष्य केंद्रित केले. डेटा प्लॅन अगदी स्वस्त केला. त्यामुळे समाज माध्यमांचा वापर करणे लोकांना सहज सोपे झाले.

ही आयडियाची कल्पना कोणाची

एवढी क्रांती करणाऱ्या जिओची आयडिया कोणाच्या सुपीक डोक्यातून आली असेल, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल? नाही का, कोणत्याही वस्तू, उत्पादन वा सेवेची सुरुवात एका छोट्या कल्पनेतूनच होते. तर जीओची आयडिया कोठून आली या प्रश्नचं उत्तर मुकेश अंबानी यांनीही दिले आहे.

हे सुद्धा वाचा

कोणी दिली जिओची आयडिया

2018 मध्ये मुकेश अंबानी लंडन येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी जिओची जन्मकथा तिथे सांगितली होती. त्यानुसार ,Jio ची कल्पना त्यांना मुलगी ईशाने दिली होती. 2011 मध्ये ईशा येल विद्यापीठात शिक्षण घेत होती. सुट्यांच्या काळात ती घरी आली होती. तिला अभ्यासक्रमाविषयीचे काही अभ्यास करायचा होता. त्यावेळी त्यांनी येथील इंटरनेट अत्यंत वाईट असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

आता इंटरनेटचा जमाना

मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याने कॉलिंग सेवेचे दिवस संपले असून आता इंटरनेटचा जमाना असल्याचे म्हटले होते. 2011 साली इंटरनेट अत्यंत कमी गतीने सेवा देत होते. तसेच महागडे असल्याने इंटरनेट हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. येथूनच जिओच्या जन्माची कुळकथा सुरु झाली.

6 वर्षांत बदलून टाकले संपूर्ण मार्केट

2016 मध्ये बाजारात दाखल झालेल्या जिओने बाजारात धमाल केली. अवघ्या सहा वर्षांत टेलिकॉम बाजार बदलून टाकला. कंपनीने त्यांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग आणि एसएमएस सेवा दिली आणि डेटावर लक्ष्य केंद्रित केले.

फ्री कॉलिंग सेवा बंद

बाजारात कंपनीने चांगला दबदबा तयार केला. पण इतर कंपन्यांच्या दबावामुळे कंपनीला फ्री कॉलिंग सेवा बंद करावी लागली. त्यात भारतीय ग्राहकांचे, विशेषतः प्रेमी जोडप्यांचे नुकसान झाले.

पुन्हा फ्री कॉलिंग सेवा

जिओला दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटर्सला कॉलिंगसाठी 6 पैसे प्रति मिनिट दर मोजावा लागत होता. जिओने हाच दर ग्राहकांना आकारला. त्यानंतर जिओची फ्री कॉलिंग सेवा पुन्हा सुरु झाली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI