AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA T20 WC 2026 : ‘ही मोठी हार, त्यांच्यासाठी..’ सुनील गावस्कर यांनी सांगितलं भारताचं नेमकं काय चुकतय?

IND vs SA T20 WC 2026 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नेहमीप्रमाणे जसप्रीत बुमराह जीनियस गोलंदाज ठरला. त्याने आपल्या गोलंदाजीने सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री सारख्या दिग्गजांचं मन जिंकलं. बुमराहने 4 ओव्हरमध्ये 15 रन्स देऊन 3 विकेट काढले तेच अर्शदीप सिंहने 4 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन 2 विकेट काढल्या.

IND vs SA T20 WC 2026 : 'ही मोठी हार, त्यांच्यासाठी..' सुनील गावस्कर यांनी सांगितलं भारताचं नेमकं काय चुकतय?
sunil Gavaskar
| Updated on: Feb 23, 2026 | 9:46 AM
Share

India vs South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना हा खऱ्या अर्थाने गतविजेत्या भारतासाठी टी20 वर्ल्ड कप 2026 मधील पहिली परिक्षा होता. टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कपमधील सलग 12 विजयांना यामुळे ब्रेक लागला. 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग 8 आणि 2026 च्या वर्ल्ड कपमध्ये चार सामने जिंकले होते. टीम इंडियाचा काल दक्षिण आफ्रिकेने 76 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह पराभवाची परतफेड केली असचं म्हणावं लागेल. कारण टीम इंडियाने याआधी 2024 च्या टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी नमवलं होतं. टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीम्स आतापर्यंत नऊ वेळा आमने-सामने आल्या आहेत. त्यात त्यांनी तिसऱ्यांदा भारताविरुद्ध असा विजय मिळवला आहे.

दक्षिण आफ्रिकेने टी20 वर्ल्ड कपमध्ये 2009 साली भारताला 12 धावांनी आणि 2022 मध्ये 5 विकेट्सने हरवलं होतं. वर्ल्ड कपमधील पुढील सामन्याआधी टीम इंडियासाठी हा पराभव म्हणजे एक धडा आहे. कुठल्या कारणांमुळे पराभव झाला? त्याचा अभ्यास चुका सुधाराव्या लागतील. टी20 फॉर्मेटमध्ये अभिषेक शर्मा 193 च्या स्ट्राइक रेटने खेळतो. वर्ल्ड कप आधी तो सुपर फॉर्ममध्ये होता. पण वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यापासून तो खराब फॉर्ममध्ये आहे. हा सगळ्यांसाठीच धक्का आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अभिषेक शर्माने दोन चौकार आणि एक षटकार मारुन 12 चेंडूत 15 धावा केल्या. यावर्षात अभिषेक शर्मा पाचवेळा शून्यावर आऊट झालाय. यात वर्ल्ड कपमध्येच तीन झिरो आहेत.

पावरप्लेमधील अपयश

अभिषेक शर्माच्या खराब फॉर्ममुळे पावर प्लेमध्ये टीम इंडियाची एकही मोठी पार्टनरशिप झाली नाही. त्याचा टीमला फटका बसतोय. अमेरिकेविरुद्ध 8 रन्सवर पहिली विकेट (अभिषेक 0), नामीबिया विरुद्ध 25 रन्सवर पहिली विकेट (संजू सॅमसन 22), पाकिस्तान विरुद्ध 1 वर पहिली विकेट (अभिषेक 0), नेदरलँड्स विरुद्ध 0 वर एक विकेट (अभिषेक 0) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुन्यवर विकेट (ईशान किशन 0) अजूनपर्यंत एकदाही भारतीय ओपनिंग जोडीने पावरप्लेचा पूर्ण फायदा उचलेला नाही. ते सुद्धा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचं एक कारण आहे.

सुनील गावस्कर काय म्हणाले?

भारताचे माजी कर्णधार आणि कॉमेन्टेटर सुनील गावस्कर STAR SPORTS वर बोलताना म्हणाले की, ‘भारताची ही मोठी हार आहे. त्यांच्यासाठी धडा घेण्याची वेळ आहे’ “टीम इंडियाच्या फलंदाजांचं शॉट सिलेक्शन योग्य नव्हतं. तुम्ही पाहिलं असेल या पीचवर बॅटवर चेंडू नीट येत नव्हता, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचे डेविड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी कशी बॅटिंग केली व चांगला स्कोर उभा केला. पण भारतीय फलंदाज असं करु शकले नाहीत” असं सुनील गावस्कर म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...